आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सुसज्ज श्री लाईफ केअर हॉस्पिटलमुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार - आमदार आशुतोष काळे

  सुसज्ज श्री लाईफ केअर हॉस्पिटलमुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार - आमदार आशुतोष काळे

सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उपक्रम कौतुकास्पद




     कोपरगाव प्रतिनिधी:----  मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटामुळे हजारो-लाखो नागरिक कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशा जीवघेण्या संकटाचा  मुकाबला करण्यासाठी परिपूर्ण आरोग्य व्यवस्था निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात सुदृढ आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी जास्तीत जास्त काम होणे गरजेचे असून सुसज्ज हॉस्पिटल हि काळाची गरज बनली आहे. हि गरज  श्री लाईफ केअर हॉस्पिटलमुळे पूर्ण होण्यास मदत होणार असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना होत असलेल्या म्युकर मायकोसीस सारख्या आजाराने तसेच  विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची गैरसोय देखील दूर होणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.


            कोपरगाव येथे डॉ. योगेश लाडे व डॉ. मयुर तिरमखे यांनी श्री लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये म्युकरमायकोसीस या आजाराची मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे व तसेच कोरोना काळात आई -वडील दोघांचे किंवा वडीलांचे निधन झालेल्या ० ते १२ वर्ष वयोगटातील बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या चिरंजीवी योजनेचे उदघाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, कोपरगाव शहरात अद्यावत सोयीसुविधा उपलब्ध असलेले श्री लाईफ केअर हॉस्पिटलने शहराच्या वैभवात भर घातली आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक उपचाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.  म्युकरमायकोसिस आजाराची मोफत चाचणी व मार्गदर्शनाबरोबरच चिरंजीवी योजनेच्या माध्यमातून श्री लाईफकेअर हॉस्पिटलने सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी श्री लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. मयुर तिरमखे म्हणाले कि, कोरोनाच्या महासंकटात आमदार आशुतोष काळे यांचा आरोग्य विभागाला मोठा आधार मिळाल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचवू शकलो. ऑक्सिजनच्या टंचाईच्या काळात ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन आम्हाला येत असलेल्या अडचणी स्वतः त्यांनी विचारून त्या अडचणी तत्काळ दूर केल्या. कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे पालकत्व स्वीकारून  त्यांनी केलेल्या उपाय योजना, दिलेले योगदान व खाजगी डॉक्टरांना देखील केलेली मदत त्यामुळे एवढ्या मोठ्या कठीण परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेला निश्चितच बळ देण्याचे काम त्यांनी केले असून  आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव तालुक्याला खंबीर नेतृत्व मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.


                     याप्रसंगी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, अजीजभाई शेख, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, फकीरमामु कुरेशी, वाल्मिक लहिरे, राहुल देवळालीकर, संदीप कपिले, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देशपांडे, संतोष बारसे, आकाश डागा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर,  डॉ., श्री लाईफकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. योगेश लाडे, डॉ. मयुर तिरमखे, डॉ. संतोष तिरमखे, डॉ. अस्मिता लाडे, डॉ. श्रद्धा तिरमखे, सोमनाथ लाडे आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments