Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

राजकीय द्वेषापोटी गरळ ओकणे थांबवा-रमेश नवले

 राजकीय द्वेषापोटी गरळ ओकणे थांबवा-रमेश नवले 
कोपरगाव प्रतिनिधी:-------
नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्यांच्या वितरीकांसाठी जमीनी संपादित केल्या त्या प्रकल्पबाधित शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून सौ स्नेहलाता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आम्हां शेतक-यांना पैसे मिळाले हे सत्य प्रकल्पबाधित शेतक-यांना माहिती आहे. ही वस्तुस्थिती असून आमच्या गावचे प्रश्न मिटविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, सौ कोल्हे यांच्यावर टीका करणारांनी त्यांच्या गावचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रत्युतर खोपडी येथील प्रकल्पबाधित शेतकरी रमेश तुकाराम नवले यांनी दिले आहे.
खोपडी येथील भूसंपादन मोबदल्याचा प्रस्तावासंदर्भात राजेंद्र खिलारी यांनी केलेल्या टीकेसंदर्भात श्री नवले यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागाला सातत्याने न्याय देणा-या माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांचेवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार श्री खिलारी यांना नसून त्यांचे त्यांच्या गावासाठीचे योगदान काय ? याचे आत्मपरिक्षण करावे. सौ कोल्हे यांनी पुर्व भागाच्या जनतेला विविध विकासकामांच्या माध्यमातून सातत्याने न्याय देण्याचे काम केलेले आहे. व्यक्तिद्वेषाने दृष्टी भ्रष्ट झालेल्या खिलारी यांना सौ कोल्हे यांनी आमदारकीच्या काळात केलेल्या विकासकामांचा डोंगर निश्चितच दिसणार नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर ते सुर्यांवर थुंकण्यासारखे होईल.
वास्तविक नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्यांच्या वितरीकांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पबाधित शेतक-यांनी ज्या ज्या वेळी माजी आमदार सौ कोल्हे यांचेकडे मागणी केली त्या त्या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रव्यवहार केला, बैठका लावल्या, मंत्रीकार्यालयापर्यंत तसेच पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच भूसंपादन कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. त्याचा तारखेनिहाय तपशील प्रकल्पबाधित शेतक-यांकडे आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय सौ कोल्हेताई यांनाच जात आहे. परंतु केवळ विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती असणारांनी कोणाच्या सांगण्यावरून गरळ ओकण्याचा प्रयत्न करू नये. असा सल्लाही श्री नवले यांनी दिला.

Post a Comment

0 Comments