आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळेंचा बाधित रुग्णांसोबत भावनिक संवाद

 आमदार आशुतोष काळेंचा बाधित रुग्णांसोबत भावनिक संवाद

         कोपरगाव प्रतिनिधी:----  लोकप्रतिनिधी म्हणून कोरोना बाधित रुग्णांसाठी केलेली सर्व प्रकारची व्यवस्था हे माझे कर्तव्य आहे. आपण सर्वजण माझ्या कुटुंबातील सदस्य असून कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेवून पुन्हा बाधा होणार नाही याची काळजी घ्या असे भावनिक आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना केले.

                आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत कोविड केअर सेंटरमध्ये मिळत असलेल्या सोयी सुविधांबाबत रुग्णांकडून माहिती घेतली. तुम्हाला योग्य उपचार मिळत आहे का, जेवण नाश्ता रुचकर मिळतो का, चहा वेळेवर देतात का, कुटुंबातील सदस्यांशी संवाद होतो का असे अनेक प्रश्न विचारून बाधित रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.यावेळी बाधित रुग्णांनी देखील आमदार आशुतोष काळे यांचेप्रती टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करत मिळत असलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.  

             बाधित रुग्णांशी संवाद साधताना आमदार आशुतोष काळे म्हणाले कि, काळजी करू नका. सकारात्मक विचार ठेवा. कोविड केअर सेंटरमधील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना  सहकार्य करा. आनंदी राहून चांगल्या प्रकारे उपचार घेवून आपल्या कुटुंबात सुरक्षित जा, पुन्हा त्रास होणार यासाठी काळजी घ्या तुम्हाला त्रास होणार याची मला खात्री आहे. काही अडचणी असतील तर सांगा. ऑक्सिजनची बेडची चिंता मिटली आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास डॉक्टरांना सांगा. वेळेत जेवण आणि औषधोपचार घेवून लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.  


Post a Comment

0 Comments