आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून कायदेशीर मार्ग काढण्याची गरज.---माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील
तरुणांनी खचून न जाता कष्ट करून आपल्या पायावर उभे राहावे
राज्यसरकारने समाजाची अवस्था बघून केंद्र सरकारला पुन्हा विनंती करावी.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:---
आज मराठा आरक्षण प्रकरणाचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष मंगेश राव पाटील आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, या क्षणाला इतकंच म्हणता येईल की सदर निकाल जो आहे त्याने मराठा समाजामध्ये शिक्षण आणि नोकरीसाठी संघर्ष करणाऱ्या युवक/युवतींची मोठ्या प्रमाणात निराशा होणार आहे.परंतु त्या सर्वांना माझ कळकळीच आवाहन आहे की कुणीही खचून न जाता कष्ट करून आपल्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करायचा आहे.
आता माध्यमांद्वारे समजलेल्या माहितीनुसार सकृद्दर्शनी इतकच म्हणता येईल कि मराठा समाजाची अवस्था समजून घेऊन माननीय राज्य सरकारने पुन्हा केंद्र सरकारला विनंती करून त्यांच्या अधिकारांमध्ये ,मराठा युवकांना व युवतींना न्याय मिळवून द्यावा. शेवटी आज कुठल्याही जाती धर्माचे जे युवा आहेत ते या देशाचे नागरिक आहेत आणि जो पर्यंत ते सक्षम होत नाहीत तोपर्यंत एका अर्थाने हा देश सुद्धा सक्षमपणे उभा राहणार नाही.
2018 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वानुमते किंवा किंबहुना एकही मत विरोधात न जाता पारित झालेला मराठा आरक्षण कायदा किवा SEBC हा कायदा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरविलेला आहे ,तरी माझी मराठा समाजासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व नेत्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित बसवून यावर योग्य तो कायदेशीर मार्ग काढून , मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा असे मतही शेवटी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments