आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणा-या नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना ५ लाखाचे विमा कवच देण्यासह विविध विभागाच्या विकास कामांना स्थायी सभेमध्ये मंजूरी –भारतीय जनता पार्टी व शिवसेना नगरसेवकांची माहीती

 कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून काम करणा-या नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना ५ लाखाचे विमा कवच देण्यासह विविध विभागाच्या विकास कामांना स्थायी सभेमध्ये मंजूरी –भारतीय जनता पार्टी व शिवसेना नगरसेवकांची माहीती

कोपरगांव प्रतिनिधी:----कोरोना काळात कोपरगांव नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी कोरोना योद्धे म्हणून काम करणा-या कर्मचा-यांचा 5 लाखाचा विमा,नगरपरिषदेमार्फत एच.आर.सी.टी स्कॅनींग मशीन,ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर,अद्यावत कार्डीयाक अँम्बुलन्स  तसेच  नगरपरिषदेच्या विविध विभागांतर्गत येणा-या विकास कामांना दिनांक 27.5.21 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेमध्ये मंजुरी दिल्याची माहिती कोपरगांव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे,भाजपा गटनेते रविंद्र पाठक व शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिली असून यासंदर्भात लवकरच मा.जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

             राज्यात गेल्या एक ते दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे बाधीत झालेल्या गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना नगरपरिषदेमार्फत आरोग्यविषयक पुरेशा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही त्यातच कोरोनाच्या     दुस-या लाटेमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे..भारतीय जनता पार्टी,शिवसेना युतीच्या सर्व नगरसेवकांनी गेल्या अनेक दिवसापांसून कोपरगांव नगरपरिषदेकडे  आरोग्य विषयक सुविधा शहरवासियांना पुरविण्यात याव्यात अशी मागणी वारंवार केली त्या मागणीस आजच्या ऑनलाईन सभेमध्ये ठेवलेल्या सर्व विषयांना मंजुरी देऊन या माध्यमातून कोपरगांवकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलले आहे.कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेत नगरपरिषदेच्या कर्मचा-यांचा कोरोना योद्धा म्हणून पाच लाखाचा विमा उतरविण्याचा निर्णयही सभेमध्ये घेण्यात आल्याने या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना याचा लाभ होणार आहे.

            नगरपरिषदेमार्फत कोपरगांव शहरवासियांसाठी सुसज्ज कोविड सेंटर सह आरोग्य विषयक अद्यावत यंत्रणा कोपरगांव नगरपरिषदेने उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सातत्याने नगरपरिषद प्रशासनाकडे केली होती या मागणीस भाजपा व शिवसेना युतीच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिल्याने कोपरगांवकरांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.कोरोनाच्या तिस-या लाटेचा परिणाम हा विशेषत: लहान बालकांवर होणार असल्यांची चिंता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी वर्तविली असल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये पेडीयाट्रीक रुग्णालयाची उभारणी करण्याची मागणी नुकतीच विवेकभैय्या कोल्हे यांनी केली होती त्यांच्या या मागणीचा सर्व नगरसेवकांनी सभेमध्ये सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी केली त्यामुळे लवकरच नगरपरिषद प्रशासन या इमारतीची पाहणी करुन या ठिकाणी पेडीयाट्रीक रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दाखल करणार आहे.या सर्व विषयांना भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी सभेमध्ये मंजूरी दिलेली असून याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष निर्णय घेतात की नाही याकडे आता सर्व कोपरगांवकरांचे लक्ष लागलेले आहे

Post a Comment

0 Comments