आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या मुलांनी अमेरिकेत फडकविला मराठीशाहीचा शैक्षणिक झेंडा

 माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या मुलांनी अमेरिकेत फडकविला मराठीशाहीचा शैक्षणिक झेंडा



कोपरगाव प्रतिनिधी:----कोपरगावचे सुपुत्र चि.शिवराज मंगेशराव पाटील  हे BE सिव्हिल नंतर  सिव्हिल फ्याकटी मध्ये एम.एस. ( MS ) पदवी संपादन करणारे  तालुक्यातील पहिले विद्यार्थी

तर कु.शिवांजली मंगेशराव पाटील ही बी.ई.सिव्हिल नंतर  PDGM-ACM ( ॲडव्हान्स कन्ट्रक्शन मॅनेजमेंट) पदवी संपादन करणारी  तालुक्यातील ठरली पहिली विध्यार्थीनी

शिवराज या तरुणाने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथून बांधकाम क्षेत्रातील कन्स्ट्रक्शन मॅनजमेंट व्यवस्थापनात मास्टर पदवी संपादन करीत मराठेशाहीचा झेंडा  फडकवला आहे अशी उच्च पदवी संपादन केलेले कोपरगाव तालुक्यातील सिव्हिल क्षेत्रातील ते पहिले पदवीधर ठरले आहेत.

शिवराज यांचे आजोबा शंकरराव कोल्हे सहकारी (संजीवनी) साखर कारखान्याचे निवृत्त बांधकाम अभियंता माधवराव पाटील यांनी  तालुक्यातील गोदावरी नदीवर कोल्हापूर पध्दतीचे के.टी.वेअर बंधारे व तालुक्यात छोटे-मोठे बंधारे आणि बांधकाम क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.त्यांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव मोठा राहिला आहे.पुढे तोच वारसा चालवत त्याचा सुपुत्र माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी कोपरगाव शहरातील शिवस्मारका सह विविध राष्ट्र पुरुषांची स्मारके उभारणी तसेच विविध बांधकामांच्या माध्यमातून नावलौकिक मिळविला आहे.नगराध्यक्ष पदाच्या अल्पावधिच्या काळातही त्यांची  कामगिरी उल्लेखनीय ठरली गेली होती .सध्या ते महात्मा गांधी चॅरिटेबल( प्रदर्शन) ट्रस्टचे विश्वस्त तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी असतात.मंगेशराव पाटील यांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव आणि मार्गदर्शन वेळोवेळी कोपरगावकरांना राहिले आहे.

शिवराज याने आजोबा (माधवराव), वडील (मंगेशराव) यांचा बांधकाम क्षेत्रातील वारसा पुढे चालवत ठेवण्याचा निर्णय घेवून बांधकाम क्षेत्रातील उच्च पदवी त्याने संपादन  केली आहे.

शिवराज आणि कु.शिवांजली हे संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी विद्या मंदिर येथे शालेय शिक्षण झाले.तर श्री सद्गुरू गंगागीर महाराज (एस.एस.जी.एम.)महाविद्यालय येथे या दोघांनी १२ वी पर्यंत विज्ञानाची पदवी संपादन करत पुढील शिक्षण संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम (सिव्हिल) पदवी संपादन केली होती.

त्यानंतर कु.शिवाजली हिने बी.ई.सिव्हिल मध्ये अंतिम ( वर्षात ) कॉलेज मध्ये पहिली येण्याचा मान मिळवला आहे . नंतर पुणे येथे निकमार (NICMAR) कॉलेज येथून दोन वर्षांची PDGM-ACM (ॲडव्हान्स कन्ट्रक्शन मॅनेजमेंट) ही पदवी संपादन केली आहे.अशी पदवी संपादन करणारी ती कोपरगांव तालुक्यातील पहिली मुलगी आहे.

तर शिवराज याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम (सिव्हिल) पदवी संपादन केल्या नंतर बांधकाम क्षेत्रातील उच्च पदवी संपादन करण्यासाठी त्यांचे वडील मंगेशराव यांनी सातत्याने प्रयत्न  केले.त्यानंतर त्याने अमेरिकेतील लाॅस एन्जलिस येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथून बांधकाम क्षेत्रातील व्यवस्थापनात मास्टर पदवी संपादन करून पाटील घराण्यात  मराठीशाहीची मान तालुक्यात उंचावली आहे.अशी उच्च पदवी संपादन केलेले  तालुक्यातील ते पहिले पदवीधर ठरले आहे.

कोपरगाव तालुक्यातील शिक्षणात पुढे जाणा-यi मुला-मुलींना चि.शिवराज आणि कु.शिवांजली युवा आयडॉल प्रेरणा स्रोत ठरले आहे.त्यांच्या दैदिप्यमान यशा बद्दल त्या दोघांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा व आजी-आजोबांची पुण्याई आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद या  जोरावर चिरंजीव शिवराज कुमार शिवांजली यांनी  घवघवीत यश मिळवले.             आज चि.शिवराज चा वाढदिवस आहे...त्याचा या दैदिप्यमान यशाचा आनंद साजरा करतांना वाढदिवसाच्या औचित्याने साखर दुधात केशर योग जुळून आला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आजी आजोबा आई वडील व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिले आहे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील व सौ.प्रियालक्ष्मी मंगेशराव पाटील यांचे सुपुत्र आणि कन्येचे समस्त कोपरगाव वासी यांकडून अभिनंदना चा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments