कोपरगाव शहराच्या रस्त्याची दुर्दशा मिटवणार. ----- आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:--- माझ्यावर दाखवलेला विश्वास व मला दिलेली जबाबदारी नेहमीच डोळ्यापुढे ठेऊन कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळवता येईल यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहरविकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी देखील मिळाला आहे. यापुढे देखील शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार असून पुढील काळात कोपरगाव शहराच्या रस्त्याची दुर्दशा मिटवणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव शहरातील विविध योजनांअंतर्गत ६८ लाख ३८ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये प्रभाग क्र. ६ मधील रस्त्यासाठी ११ लाख १३ हजार रुपये निधीतून लोहाडे घर ते को.न.पा. शाळा रस्ता,प्रभाग क्र. ९ मधील धारणगाव रोड ते शिवशांती इस्टेट रस्ता १५ लाख २५ हजार व प्रभाग क्र. ३ मध्ये ४२ लाख रुपये निधीतून श्री. साईबाबा कॉर्नर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा या रस्त्यांचा सामावेश आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, नगरविकास खात्याकडून काही दिवसांपूर्वी शहराच्या विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे. यामध्ये धारणगाव रोड विकसित करणे २ कोटी, प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १ कोटी, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्ष, कोपरगाव शहरातील (बाजारतळ) स्मशानभूमी विकसित करणे १ कोटो, कोपरगाव शहरातील (मोहनीराजनगर) स्मशानभूमी विकसित करणे ५० लक्ष असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करून पुढील कामासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. कोरोनाच्या परिस्थितीत देखील कोपरगाव शहराच्या विकासासाठी मागील दीड वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी शासनदरबारी अनेक प्रस्ताव दाखल आहेत टप्प्या टप्प्याने त्यांना देखील मंजुरी मिळणार असून शहरवासीयांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, भरत मोरे, दिलीपशेठ अजमेरे, विजय बंब,रवींद्र बंब, अमोल अजमेरे, सचिन ठोळे, शैलेश ठोळे, रवि ठोळे, डॉ. प्रेमचंद ठोळे, आकाश डागा,दिनेश संत, मयुरेश बांगर, प्रशांत चिमणपुरे, अतुल कोताडे सर, नेणनकर साहेब, उपाध्ये, बोरावके, डॉ. सोनवणे, चव्हाण, दीपक बुधवंत, पवन अग्रवाल,बनकर साहेब, नानासाहेब वाकचौरे, नानासाहेब बोरावके, सूर्यवंशी सर, नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता दिगंबर वाघ आदी सोशल डिस्टंन्सिंग पाळून उपस्थित होते.
चौकट:-- आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून विकासाला वेग
कोपरगाव शहराच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच विकासकामांना प्राधान्य देवून शहरविकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहराच्या विकासाची गाडी रुळावर येवून शहरविकासाच्या कामांना वेग आला आहे. – नगराध्यक्ष विजयराव वहाडणे.
0 Comments