म्युकरमायकोसिसच्या आजारावर सर्व डाॅक्टरांनी एकत्र यावे - विवेक कोल्हे
![]() |
कोपरगांव प्रतिनिधी:---- गेले दीड वर्षापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणावर रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत परंतु काही रूग्णांना कोरोना उपचारानंतरच्या अनेक व्यांधींचाही सामना करावा लागतोय त्यात प्रमुख्याने म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने अनेक रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, त्यासाठी पोस्ट कोविड सेंटरवर कान, नाक, घसा तज्ञ यांची नेमणूक करण्यात यावी. कोविड झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी. या आजाराचे गंभीर स्वरूप विचारात घेता याकरता योग्य ती पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने सर्व डाॅक्टरांनी एकत्र येवुन नियोजन करावे असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले आहे.
दिवसेदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत तर काही ठिकाणी कमी होत आहे, कोरोनानंतर आता पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस आजार प्रचंड वेगाने वाढत असुन आज प्रत्येक रुग्णांपुढे संकट उभे राहिलेले आहे.
यात प्रामुख्याने कान, नाक, घसा तज्ञांवर विशेष जबाबदारी राहणार आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी प्रशासनाने व डॉक्टरांनी
एकत्र येवुन यासाठी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. सदरच्या आजारावरील रुग्णांना शासनामार्फत महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश करण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहेत. परंतु या जनआरोग्य योजनेत कान, नाक व घसा यावर उपचार करणा-या ज्या रूग्णालयांचा समावेश नाही त्यांचा तातडीने समावेश करणे देखील गरजेचे आहे. म्युकरमायकोसिस च्या रुग्णांना उपचारासाठी सर्व डाॅक्टरांनी एकत्र येवुन आपले विशेष योगदान द्यावे अशी विनंती देखील केली आहे.
0 Comments