आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळे पुन्हा धावले आरोग्य विभागाच्या मदतीला, स्वखर्चातून दोन हजार टेस्टिंग आरोग्य विभागाला सुपूर्द

 आमदार आशुतोष काळे पुन्हा धावले आरोग्य विभागाच्या मदतीला,

स्वखर्चातून दोन हजार टेस्टिंग आरोग्य विभागाला सुपूर्द 

कोपरगाव प्रतिनिधी:-----  राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ असलेली कोरोना बधितांची संख्या त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत असून संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य साहित्याचा तुटवडा जाणवत आहे. अशीच परिस्थिती कोपरगाव तालुक्यात देखील मागील काही दिवसांपासून निर्माण झाल्यामुळे आमदार आशुतोष काळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या मदतीला धावून आले असून त्यांनी स्वखर्चातून दोन हजार टेस्टिंग किट  आरोग्य विभागाला सुपूर्द केल्या आहेत.
रॅपिडअँटिजेंन टेस्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या टेस्टिंग किटची मागील आठवड्यात निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पदरमोड करून आरोग्य विभागाला एक हजार टेस्टिंग किट दिल्या होत्या.मात्र ह्या टेस्टिंग किट संपल्यानंतर शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोपरगाव तालुक्याला वेळेवर टेस्टिंग किट उपलब्ध न झाल्यामुळे पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यात टेस्टिंग किटची टंचाई जाणवू लागली होती. अशा वेळी शासनाच्या आरोग्य विभागाकडून येणाऱ्या मदतीची वाट न पाहता आमदार आशुतोष काळे यांनी स्वखर्चातून दोन हजार टेस्टिंग किट खरेदी करून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्याकडे सुपूर्द केल्या. आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा करावा याबाबत दोन दिवसापूर्वीच पालक मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मागणी केली.लवकरात लवकर आरोग्य साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र आरोग्य विभागावर पडलेला ताण पाहता वेळेवर सर्वच गोष्टी उपलब्ध होण्यास अडचणी आहेत. त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाकडून जरी वेळेवर आरोग्य साहित्य उपलब्ध झाले नाही तरी आरोग्य विभागाला यापुढे देखील सर्व प्रकारची मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.दोन हजार टेस्टिंग किट उपलब्ध झाल्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी यावेळी सांगितले. मागील वर्षापासून आमदार आशुतोष काळे नेहमीच आरोग्य विभागाला  सर्वतोपरी मदत करीत असून आम्हाला येणाऱ्या अडचणी त्यांनी तातडीने सोडविल्या आहे. मागील आठवड्यातच त्यांनी एक हजार टेस्टिंग किट दिल्या असून आज पुन्हा एकदा दोन हजार टेस्टिंग किट उपलब्ध करून दिल्या आहे.त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यात येऊन वाढत्या कोरोना संसर्गाला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी  सांगितले.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, ज्ञानेश्वर काळे, नारायण लांडगे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे,  डॉ. महेंद्र गोंधळी, डॉ. खोत, डॉ. कुणाल गर्जे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments