आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिर्डी संस्थानच्या श्री.साईबाबा हाॕस्पीटलमध्ये प्लाझ्मा मशिन व आॕक्सीजन बेड त्वरीत सुरु करावे कोपरगावच्या सेवा प्रतिष्ठाण ने केली मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या कडे केली निवेदनाद्वारे मागणी.

शिर्डी संस्थानच्या श्री.साईबाबा हाॕस्पीटलमध्ये प्लाझ्मा मशिन व आॕक्सीजन बेड त्वरीत सुरु करावे 

 कोपरगावच्या सेवा प्रतिष्ठाण ने केली मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या कडे केली निवेदनाद्वारे मागणी.




कोपरगाव  प्रतिनिधी:-------- पहिल्या कोरोनोच्या लाटेपेक्षा दुसरीलाट जीवघेणे सारखी असल्याने अनेक नागरिक आपला जीव मुठीत धरुन बसले आहेत तर काही रुग्णांना आॕक्सीजन बेड, रेमडीसीव्हर इंजेक्शन, आदि औषधांसाठी उपलब्ध करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरावे लागत आहेत.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेमडिसीव्हर इंजेक्शन पेक्षा “प्लाझ्मा” हा रुग्णासाठी संजीवनी ठरत असल्याने जवळपास सुविधा नसल्याने १०० ते १५० कि.मी.प्रवास करुन प्लाझ्मा उपलब्ध करावे लागत असुन शिर्डी संस्थानच्या श्री.साईबाबा हाॕस्पीटलने प्लाझ्मा मशिन व आॕक्सीजन बेड त्वरीत सुरु करावे अशी मागणी कोपरगांव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सेवा प्रतिष्ठाण ने मुख्यमंञी श्री. उध्दव ठाकरे , शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहेत.

गेले एक दीड वर्षापासुन कोरोना महामारी ने संपूर्ण जनजीवन बरोबर देशासह राज्याचे आर्थिक बजेट कोलमंडले आहेत. कोरोना पासुन नागरिकांना संरक्षण देण्यासाठी कोरोना विरुध्द लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, सर्व प्रशासन रांञदिवस एक करत आहेत. माझे कुटुंब , माझी जबाबदारी ही मोहीम राबविल्यामुळे सकारात्मक परिणाम दिसुन आला आहे. तसेच या माध्यमातून झालेले जनजागृती देखील प्रत्येक नागरिकांपर्यंत , गाव, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहचले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची आकडेवारी वाढत असल्यामुळे  प्रशासनावर कामाचा ताण देखील वाढत आहे तर दुसरीकडे रुग्णांना आॕक्सीजन बेड, रेमडीसीव्हर इंजेक्शन, आदि औषधांसाठी उपलब्ध करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना जास्तच कष्ट घ्यावे लागत आहे.

रेमडिसीव्हर इंजेक्शन पेक्षा “प्लाझ्मा” हा रुग्णासाठी संजीवनी ठरत असला तरी जवळपासच्या तालुक्यात प्लाझ्मा मशिन व सुविधा नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मासाठी खुप कसरत करावे लागत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेवुन श्री. साईबाबा संस्थानच्या हाॕस्पीटल मध्ये सुविधा सुरु केल्यास निश्चितच रुग्णांना वेळेवर प्लाझ्मा मिळेल तसेच रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण होणार नाही व विशेष म्हणजे रुग्णांचे आर्थिक बचत होण्यास खुप मदत होईल शिर्डी संस्थानने आज पर्यंत देशात , राज्यात महापुर, दुष्काळ आदि कोणतेही संकट आले त्यावेळी सर्वात प्रथम मदतीचा हात शिर्डी साईबाबा संस्थानने मदतीचा हात पुढे केला आहे.

संस्थान करत असलेले कार्यात महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना व भाविकांना अभिमानाची बाब आहे. सध्या कोरोना संकट अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत या काळात देखील संस्थान शक्य तितके मदत तसेच उपाय योजना करत आहेत त्याच पध्दतीने प्लाझ्मा व आॕक्सीजन बेड सुविधांसाठी संस्थान ने पुढाकार घ्यावा अशी मागणी सेवा प्रतिष्ठाण ने दिलेल्या निवेदनात म्हणटले आहेत. सदरचे निवेदन मुख्यमंञी उध्दव ठाकरे , उपमुख्यमंञी श्री. अजितदादा पवार, आरोग्यमंञी श्री. राजेशजी टोपे, महसुलमंञी श्री. बाळासाहेब थोरात, श्री. हसनजी मुश्रीफ ग्रामविकास मंञी तथा पालकमंञी,जिल्हाधिकारी, प्रातंधिकारी, तहसिलदार यांना देखील लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहेत. सेवा प्रतिष्ठाण ने शिर्डी संस्थानला निवेदन दिले त्याप्रसंगी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कृष्णा आढाव, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाबळे, संतोष वढणे, सोमनाथ आढव, विशाल निकम, मनिष जाधव, दिनेश गाडेकर आदि सेवा प्रतिष्ठाणचे सेवक उपस्थितीत होते.





Post a Comment

0 Comments