ज्यांना विकासाची अॅलर्जी होती त्यांना विकास करणाऱ्या आमदारांची देखील अॅलर्जी झाली
- नगराध्यक्ष विजयराव वहाडणे
कोपरगाव प्रतिनिधी:--- कोपरगाव नगरपरिषदेला आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाचे संकट असतांना देखील दीडच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराचे विकासाचे विविध प्रश्न मार्गी लागणार आहे ही शहरवासियांच्या दृष्टीने अतिशय समाधानाची गोष्ट आहे. कोपरगाव शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होत असल्यामुळे काहींना वेदना होत असून त्यांची आदळ आपट सुरु आहे. हा त्यांचा स्थायी स्वभाव असून आजपर्यंत ज्यांना नेहमी कोपरगाव शहराच्या विकासाची अॅलर्जी होती त्यांना आता विकास करणाऱ्या आमदारांची देखील अॅलर्जी झाली असल्याचे यावरून दिसून येत आहे अशी टीका नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी मा.आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.
कोपरगाव शहरात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ३१ लक्ष ८४ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे बोलत होते. यावेळी प्रभाग क्र. ३ मध्ये ११ लक्ष ७९ हजार रुपये निधीतून महेश वेल्डिंग वर्क्स ते सुखसागर बिल्डिंग रस्ता, प्रभाग क्र. ८ मध्ये ७ लक्ष ३३ हजार रुपये निधीतून संजस्वा हॉटेल ते जगताप घर ते नाला रस्ता व प्रभाग क्र. २ मध्ये १२ लक्ष ७१ हजार रुपये निधीतून श्रीरामनगर ते बँक कॉलनी रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
पुढे बोलतांना वहाडणे म्हणाले की, आमदार आशुतोष काळे यांच्या मदतीने कोपरगाव शहराच्या विकासाची कामे मार्गी लागत आहे व भविष्यात देखील विकासकामांचा ओघ हा असाच सुरु राहिला तर आपली पंचाईत होईल अशी काहींना भीती वाटत आहे. कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी कोपरगाव नगरपरिषदेत सर्वानुमते ठराव करून कोपरगाव शहरात रस्त्यांची कामे होवू द्यायची नाही असा ठराव मंजूर केला. त्यावेळी आमदार आशुतोष काळे व मी स्वत:जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलो. त्यावेळी हि नामंजूर करण्यात आलेली विकासकामे मंजूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांची मोठी मदत झाली असून ती कामे देखील सुरु होणार आहेत. परंतु ज्यांना विकास नकोय, ज्यांना जनतेला वेठीस धरायचे, अशी ज्यांची परंपरा आहे त्या कोल्हे व कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आपली परंपरा कायम ठेवत शहर विकासाला आजवर नेहमीच अडथळा आणला आहे. मात्र यापुढे आमदार आशुतोष काळे कोपरगाव नगरपरिषदेच्या मागे खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे आता ते विकासाला अडथळा आणू शकत नाही असे वहाडणे यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,संदीप पगारे, फकिरमामु कुरेशी, रमेश गवळी, भरत मोरे, इम्तियाज अत्तार, राहुल देवळालीकर, राजेंद्र बोरावके, राजेंद्र आभाळे, संतोष शेजवळ, योगेश वाणी, रोशन शेजवळ, विजय बागडे, सोमनाथ आढाव, प्रसाद नाईक, सचिन मोरे, विजय खेडकर,वाल्मीक चांदर, महेश खेडकर, गणेश आढाव,रावसाहेब रोहमारे, संजय जगताप, सोळसले सर,अरुण भास्कर, आकाश कानडे, अशोक क्षीरसागर,बोरसे सर, भोईर सर, शिंदे सर, अनिरुद्ध काळे, प्रदीप मते, वसीम शेख, राजेंद्र राऊत, सद्दाम शेख, सलमान शेख, सोमनाथ लांडे, गणेश गोसावी, योगेशगोसावी,मोसीम शेख, तौसिफ शेख आदी उपस्थित होते.
चौकट :- कोपरगाव नगरपरिषद करीत असलेल्या शहरविकासाच्या कामाला मी नेहमीच पाठिंबा दिला आहे. माझ्या नगरसेवकांनी नेहमीच सभागृहात पाठींबा दिला असून यापुढे देखील पाठींबा राहणार आहे. कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास व पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावणे हेच माझे ध्येय आहे.-आ,आशुतोष काळे
0 Comments