आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड -श्री. अमित कोल्हे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत यशस्वी वाटचाल

   संजीवनी पाॅलीटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची  बजाज ऑटो  मध्ये निवड -श्री. अमित कोल्हे

  कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत यशस्वी वाटचाल




कोपरगांव प्रतिनिधी:----- संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकच्या २८ विद्यार्थ्यांची  वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत ट्रेनी  इंजिनिअर्स या पदावर कोविड १९ च्या काळात व्हर्चुअल पध्दतीने मुलाखती घेवुन  निवड केली आहे. संजीवनी पाॅलीटेक्निक हे ऊद्योग जगताला  आवश्यक  असलेले मनुष्यबळ पुरविण्यास योग्य दिशेने  वाटचाल करीत असल्याची पावती विध्यार्थ्यांच्या  अंतिम निकाला अगोरदच निवड होत असल्याने मिळत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे   मॅनजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री. कोल्हे पुढे म्हणाले की ऊद्योग जगताची गरज ओळखुन संजीवनीमध्ये विध्यार्थ्यांना  पहिल्या वर्षांपासून  मुलाखती कशा  द्याव्यात, आपापल्या क्षेत्रात कोणते अद्ययावत ज्ञान घ्यावे, संभाषण  कौशल्य, देहबोली, इत्यादी बाबींचे प्रशिक्षण  देण्यात येते. त्यामुळेच संजीवनीचे विध्यार्थी मोठ्याा संख्येने नामांकित कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहेत. बजाज ऑटो  कंपनीने निवड केलेल्या विध्यार्थ्यांमध्ये साक्षी रामदास शेलार,  अभिषेक  सिताराम माळवदे, श्रध्दा सुर्यकांत मोटे, तुषार  एकनाथ बांगर, सुयश  अजय लहरे, महिमा गोकुळ चौधरी , सौरभ गणेश  गलांडे, संकेत बाळासाहेब कर्पे, प्रियंका बाळासाहेब बोराडे, दिपाली राजेंद्र काळे, विशाल ज्ञानेश्वर  रंधे, आदित्य दत्तात्रय सोणवने, नम्रता कमलाकर कसबे, सोनिया राजेंद्र भालेराव, कोमल अमृत चव्हाण, रोहन भगवान रोकडे, ताहिद अमिर शेख , शुभम रावसाहेब बाचकर, अक्षय संजय वाकचौरे , शुभम अनिल घोडेराव, सिध्दार्थ चंद्रकांत कानडे, शुभम दत्तु गुंजाळ, पुजा चांगदेव काळे, सिध्दार्थ कैलास सांगळे, संकेत भरत कानडे, अक्षय सुभाश हिवराळे, ओंकार राजेंद्र बोरावके व सार्थक रमेश शिंदे  यांचा समावेश  आहे.ज्या विध्यार्थ्यांना  पुढे उच्च शिक्षणासाठी जायचे नाही अशा  सर्व विध्यार्थ्यांना  कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्यासाठी प्रयत्न असतो.
संजीवनी  ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले, तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री. अमित कोल्हे यांनीही अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments