आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील 10 गावांना लोकप्रतिनिधींनी अखेर सोडले वा-यावर- माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे.


कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील 10 गावांना लोकप्रतिनिधींनी अखेर सोडले वा-यावर- माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे.






कोपरगांव प्रतिनिधी-:---- वाढत्या संक्रमणामुळे दिवसागणिक रुग्ण संख्येत वाढ होत असतांना मृत्युच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे.राहाता तालुक्यातील चितळी सारख्या गावात एक महिन्याच्या कालावधीत मृत्युचे अर्धशतक गाठलेले आहे ही चिंतेची बाब असून प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी करुन या भयंकर परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी काय करत आहेत असा सवाल भाजपा प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केला आहे.


       देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.कोपरगांव मतदार संघातील रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.दिवसागणिक वाढत असलेली रुग्णसंख्या ही अतीशय मोठी चिंतेची बाब असून मतदार संघातील चितळी सारख्या गावतही अक्षरक्ष:कोरोनाने थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार करुन घ्यावे असे आवाहन सौ.कोल्हे यांनी केली आहे.


वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे होते.संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असतांना जनजागृती तसेच प्राथमिक उपचार करुन रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक होते, पंरतू योग्य ते नियोजन न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली.दुर्देवाने चितळीकरांवर आलेल्या या महाभयंकर संकटात अनेक जेष्ठ,तरुण तसेच कुटुंबातील कर्त्या व्यक्तींना प्राणास मुकावे लागले आहे आता तरी लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे,त्याकरीता संशयीत रुग्णांच्या अँटीजन चाचण्या व इतर तपासण्या करुन रुग्णसंख्येवर आळा घालण्य़ासाठी उपाययोजना कराव्या अशीही मागणी केली आहे. कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थीतीमध्ये नागरिकांना दिलासा देण्याची गरज असून आज लोकप्रतिनिधी कोठे आहेत असा सवालही सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केला आहे.

 

चौकट-कोपरगांव विधानसभा मतदार संघातील चितळी गावात एकाच महिन्यात कोरोनामुळे दुर्देवी निधन झालेल्या नागरिकांचे अर्धशतक झाले असून ही अंत्यत दुखद घटना आहे. कोरोनामुळे गावातील नागरिकामंध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागू नये यासाठी आतातरी दखल घेणे गरजेचे आहे.-माजी 

Post a Comment

0 Comments