परखड व निर्भीड ज्येष्ठ पत्रकार अशोक सदाफळ यांचे निधन.
![]() |
कोपरगाव/राहाता प्रतिनिधी:---
राहाता येथील दैनिक सार्वमतचे तालुका प्रतिनिधी अशोकराव कारभारी सदाफळ वय ५२ यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
सदाफळ निर्भिड आणि परखड लिखान करत. राहाता तालुकाच नव्हे तर जिल्हाभरात त्यांचा जनसंपर्क होता. तरुण वयात त्यांनी नाशिकच्या दैनिक गावकरीतून दैनिक सामना मधुन पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक सार्वमत चे ते २०वर्ष तालुका प्रतिनिधी होते.
दैनिक सार्वमतमध्ये आपल्या परखड लिखाणातून नगर जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. राहाता शहर परिसरातुन, राहाता तालुक्यातील, ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या शेतकर्यांच्या समश्या दैनिक सार्वमतमध्ये मांडून त्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. राहाता भागातील पेरु उत्पादकांच्या समस्या, पाणी प्रश्न, नागरिकांचे मुलभूत प्रश्नासाठी पत्रकारिता केली. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातुन राजकीय सामाजिक प्रशासकिय श्रेत्रा
वर त्यांनी वेगळा असा दवाब निर्माण केला होता. राहाता तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्राला त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बंधु भाऊसाहेब, सुभाषराव, सुखदेव यासह बंधुसह असा मोठा परिवार आहे.
0 Comments