पत्नीच्या पाठोपाठ पतीचे ही निधन
श्रीरामपूर मोरगे वस्ती परिसरातील घटना
![]() |
श्रीरामपूर प्रतिनिधी:---- श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती येथील शासकीय लेखा अधिकारी निवृत्ती मानसिंग मोरे वय ७२ यांचे नुकतेच निधन झाले २४ तासापूर्वी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई निवृत्ती मोरे वय ६८यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते पत्नीच्या निधनाचा धक्का त्यांना सहन न झाल्याने पत्नी पाठोपाठ पतीचेही निधन झाले धार्मिक मनमिळाऊ सामाजिक कामात त्याचे नेहमीच योगदान होते अशा प्रकारची धक्कादायक घटना घडल्याने मोरगे वस्ती परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेने मोरगे वस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
अधिक माहिती अशी की या भागातील माजी नगरसेविका राघेश्वरी सुनिल मोरे यांच्या सासू चे २४ तासापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते त्या घटनेने हे कुटुंब व दुःखात असताना त्यापाठोपाठ सासरे व निवृत्त शासकीय लेखाधिकारी निवृत्ती मानसिंग मोरे यांचे निधन झाले पत्नीच्या पाठोपाठ पतीचे निधन होण्याची परिसरातील पहिलीच घटना आहे मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यात योगदान असलेल्या कुटुंबावर अशा प्रकारचे संकट ओढवल्याने श्रीरामपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे श्रीरामपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील मोरे व संजय मोरे यांची ती आई वडील होते त्यांच्यामागे दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे
0 Comments