आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून कोपरगावला ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर एस.एस.जी.एम. कोविड सेंटरमध्ये १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेवून आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव साईबाबा तपोभूमी येथे महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या भव्य हॉलमध्ये ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच सध्या सुरु असलेल्या एस.एस.जी.एम. कोविड सेंटरमध्ये १०० ऑक्सिजन बेड आमदार आशुतोष काळे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात मागील महिन्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काही रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. कोरोना संकटाचे उग्र रूप पाहता भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारून चालणार नाही त्यासाठी वेळेत उपाय योजना करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. बाधित रुग्णांना उपचार घेण्याच्या दृष्टीने कोपरगाव तालुक्याच्या मध्यावर असलेल्या श्री.साईबाबा तपोभूमी येथे महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या दोनही भव्य हॉलमध्ये सर्व सुविधांनी युक्त जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौन्दर यांनी नुकतीच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत साईबाबा तपोभूमी येथे पाहणी करून जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे.
कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असून अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी ५० ऑक्सिजन बेडची उपलब्धता करून देणार असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरु आहे. मात्र बाधित रुग्णांची ऑक्सिजन बेडची वाढती मागणी लक्षात घेवून आमदार आशुतोष काळे एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये आता ५० ऐवजी १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांच्या पुढाकारातून श्री.साईबाबा तपोभूमी येथे महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या दोनही भव्य हॉलमध्ये सर्व सुविधांनीयुक्त ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौन्दर यांनी पाहणी करून सांगितले आहे. यावेळी साईबाबा तपोभूमीचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक मंदार पहाडे आदि उपस्थित होते
0 Comments