आमदार आशुतोष काळेंच्या पुढाकारातून रूग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन अँम्बुलन्स दाखल
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-------- कोपरगाव तालुक्यात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेत आरोग्य उपचार उपलब्ध व्हावे या दुरदृष्टीतून आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णय घेऊन पुढाकार घेत
महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन अँम्बुलन्स उपलब्ध करून दिली आहे.
मागील एक महिन्यापासून कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या बाधित रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी यामध्ये आरटीपीसीआर, एचआरसिटी तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यासाठी जावे लागते. कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन बेडवर उपचार घेण्यासाठी रुग्णांना तातडीने घेऊन जाण्यासाठी या ऑक्सिजन अँम्बुलन्सचा मोठा फायदा होणार आहे. या ऑक्सिजन अँम्बुलन्सचे मंगळवार (२७) रोजी नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे.टेस्टिंग किटची काहीशी निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी एक हजार टेस्टिंग किट आरोग्य विभागाला स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या एक दोन दिवसात एसएसजीएम महाविद्यालयाच्या वसतिगृहात १०० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.साईबाबा तपोभूमी येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये शेकडो रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहेत. अशा प्रकारे कोरोना बाधित रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देवुन आमदार आशुतोष काळे यांनी उपलब्ध करून दिलेली ऑक्सिजन अँम्बुलन्समुळे अनेक गंभीर रुग्णांचा जीव वाचणार असून निश्चितपणे कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.
ऑक्सिजन अँम्बुलन्सच्या लोकार्पण प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, विश्वस्त मंगेश पाटील, मंदार पहाडे, मन्नूशेठ कृष्णानी, साईबाबा तपोभूमी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रोहित पटेल, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. तुषार गलांडे, डॉ. झिया शेख, डॉ. दीपक पगारे, डॉ. स्वालिया पठाण तसेच महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे वैद्यकीय सेवा देणारी टीम आदी उपस्थित होते.
0 Comments