आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आपण सावध झालो नाही तर कोविड सेन्टर,हॉस्पिटल,अमरधामही कमी पडतील. ------- नगराध्यक्ष विजय वहाडणे.

 आपण सावध झालो नाही तर कोविड सेन्टर,हॉस्पिटल,अमरधामही कमी पडतील.

                ------- नगराध्यक्ष विजय वहाडणे.


            


  कोपरगाव प्रतिनिधी :----- मागील वर्षी (2020)कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी कोरोना रुग्ण कोपरगावात होते.त्यावेळी कोरोना नियंत्रणात रहावा,प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महसुल प्रशासन,कोपरगाव नगरपरिषद,पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आपण शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केलीच होती,पण आपण स्थानिक पातळीवरही काही निर्णय घेऊन राबविले होते.आठवड्यातून एक दिवस पूर्ण लॉकडाऊन,दैनंदिन व्यवहाराच्या वेळाही आपण कमी केल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला कि, कोरोना नियंत्रित झाल्याने रुग्णासंख्या आटोक्यात राहिली.

             आज मात्र कोरोनाचा धोका वाढलेला दिसतो. काल तर रुग्णसंख्या 150 पर्यंत जाऊन मृत्यू संख्या 6 झाली.याच वेगाने प्रादुर्भाव वाढत गेल्यास आरोग्य व्यवस्थाही कमी पडणार आहे.अंत्यसंस्कार करायला नातेवाईकही धजावत नसतांना कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी हे जोखमीचे काम करताहेत.तहसील,पोलीस, आरोग्य या सर्व यंत्रणा रात्रंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू यासाठी प्रयत्न करत आहेत.पण अजूनही काही गलथान नागरिक मास्क वापरत नाहीत,काही अस्थापनात प्रचंड गर्दी होत असल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.मागील वर्षी स्थानिक पातळीवर काही निर्णय घेतल्यावर  "गोरगरिबांचे पत्रकबाज कैवारी" जास्तच तयार झाले.गरिबांना किराणा देणार का-रेशन देणार का असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जायला लागले.कोरोनाविरुद्धच्या लढयात कुठलेही योगदान न देता केवळ कंमेंट्स-टिका झाल्याने,यावेळी यंत्रणेतील कुणीही रिस्क घेऊन निर्णय घ्यायला तयार नाही,त्यांचे योग्यच आहे.कारण जीवावर उदार होऊन काम करायचे व टिकाही सहन करायची असे बरोबर नाही.

           नागरिकांनी  मास्कचा व सॅनिटायझरचा वापर,स्वच्छता,सुरक्षित अंतर याची अंमलबजावणी स्वतःच प्रामाणिकपणे करावी.तरच भयावह कोरोना रोखता येईल.आज जिल्ह्यात कोपरगावची  रुग्णसंख्या दोन नंबरची आहे.आपण आता जर सावध झालो नाही तर कोविड सेन्टर,हॉस्पिटल,अमरधामही कमी पडण्याचा मोठाच धोका आहे.शासकिय यंत्रणेला सहकार्य करावे ही नम्र विनंती.कुठलेही सामाजिक कार्य न करता 

" कोरोनाबाबत" केवळ टीकाटिप्पणी करणाऱ्या प्रवृत्तीवर शासनाने योग्य कारवाई केली पाहिजे.ज्यांना काही सूचना-बदल सुचवायचे असल्यास अधिकृत शासकिय यंत्रणेशी संपर्क करावा ही विनंती.संचारबंदी असतांनाही विनाकारण फिरणे योग्य नाही,यंत्रणेला सहकार्य करणे आवश्यक आहे.अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल,तो कुणालाच परवडणारा नाही. 

           काही नागरिकांच्या गलथानपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढत जाऊन रुग्णालयात बेडही उपलब्ध झाले नाहीतर शासकिय यंत्रणेला दोष देण्यात काही अर्थ नाही.म्हणून वेळेतच सावध होऊन प्रत्येकाने कोरोना रोखण्याच्या कामात योगदान द्यावे ही विनंती असेही नगराध्यक्ष विजय वाहडणे यांनी प्रसिद्धीपत्रकात शेवटी म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments