पालखेड कालवा लाभक्षेत्रात असणारे कोपरगाव तालुक्यातील को.प बंधारे तातडीने भरून द्यावे- सौ.स्नेहलता कोल्हे
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:--------
पालखेड कालव्याचे पाणी नाशिक जिल्ह्यातील बोकटे इथपर्यंत आलेले असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील या कालव्याच्या लाभक्षेत्र गावांतील को.प.बंधारे तातडीने भरून द्यावे अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव व कोपरगाव मतदारसंघाच्या माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.
पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.राजेश गोवर्धेने यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,कोपरगाव मतदारसंघातील पूर्व भागातील तिळवणी,सावळगाव,शिरसगाव,आपेगाव ही गावे पालखेड कालवा लाभक्षेत्रात येत असून जिरायती भागातील ही गावे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत.सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहिरी कोरड्या झाल्या असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या भागासाठी पालखेड कालव्यातील पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.सध्या हे पाणी नाशिक जिल्ह्यातील बोकटे इथपर्यंत आले असून ते पुढे तिळवणी, शिरसगाव, सावळगाव,आपेगाव येथील को.प.बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.
0 Comments