Vardhapan bannr

Vardhapan bannr

आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh

कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिव्हीर व ऑक्सिजन राखीव ठेवा. ------- विजय वहाडणे

 कोरोना योद्ध्यांसाठी रेमडेसिव्हीर व ऑक्सिजन राखीव ठेवा. 

------- विजय वहाडणेकोपरगांव प्रतिनिधी:----- कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे, विशेषतः नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग, सर्व वैद्यकीय सेवा डॉक्टर- नर्सेस- आशा सेविका- काही शिक्षक, पत्रकार इ. सेवेत असणाऱ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर तातडीने उपलब्ध व्हावेत म्हणून रेमडेसिव्हीर व ऑक्सिजनचा राखीव  साठा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्दैवाने आजपर्यंत अनेक कोरोना योद्धेही सेवा करतांना कोरोनाला बळी पडलेले आहेत. प्रत्यक्षात कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणारे सफाई कर्मचारी तर जास्तच बिकट परिस्थितीत काम करत आहेत. कोरोना योध्यांना व त्यांच्या कुटुंबियांना इंजेक्शन व ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागणे योग्य नाही. म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेबांनी या मागणीची तातडीने दखल घ्यावी. तरच आपली सर्व यंत्रणा कार्यक्षमतेने काम करू शकेल. प्रत्यक्ष लढणारी यंत्रणा सुदृढ ठेवणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.             

Post a Comment

0 Comments