कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जयंतीनिमित्त
कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला
मोफत सॅनिटायझर.
कोपरगाव प्रतिनिधी:--- माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कोरोना संकटाचा वाढता धोका लक्षात घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला आमदार आशुतोष काळे व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने मोफत सॅनिटायझर देणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात देखील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील नागरिकांचे कोरोना पासून बचाव करण्यासाठी खाजगी रुग्णालयात मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक कुटुंबालामोफत सॅनिटायझर देण्याचा आमदार आशुतोष काळे यांनी निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मतदार संघातील नागरिकांना आमदार आशुतोष काळे यांनी मोफत आरोग्यसेवा, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना रेशनवर मोफत धान्य वाटप तसेच आरोग्य विभाग व प्रशासनाला विविध माध्यमातून सर्वतोपरी मदत केली आहे.मागील काही महिन्यापूर्वी कोरोना संकटावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळविले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे रोजच शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला आळा बसावा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक कुटुंबांला त्यांच्या घरपोच सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले आहे
0 Comments