आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगांव तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणणेसाठी पुरेशा उपाययोजना करा. सौ.स्नेहलता कोल्हे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी.

 कोपरगांव तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणणेसाठी पुरेशा उपाययोजना करा.

सौ.स्नेहलता कोल्हे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी.
       कोपरगाव प्रतिनिधी :---
सध्या कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने लढत आहे मात्र पुरेशा साधनसामुग्री अभावी रुग्णांना सेवा देण्यास अडथळे येत आहेत.त्यामुळे कोपरगांव विधानसभा मतदार संघातील  रुग्णांची संख्या झपाट्याने  वाढत आहे ही रुग्णवाढ रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,मा.आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे ग्रामविकास तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचेकडे केली आहे.
    कोपरगांव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे कोरोना आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीस  खासदार सदाशिव लोखंडे,आमदार आशुतोष काळे,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचेसह पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी सौ.कोल्हे बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की,कोपरगांव तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून संसर्ग झालेल्या रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असून नातोेवाईकांनाही प्रचंड मनस्ताप सहन  करावा लागत आहे.प्रशासनाच्या वतीने ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे,परंतू यासाठी लागणारी साधन सामुग्री, सोयी-सुविधा अपु-या पडत असल्याने रुग्णांना सेवा देण्यास अडथळे येत आहेत.त्याकरीता कोपरगांव तालुक्यात व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढविण्यात यावी,HRCT चाचणी करण्यासाठी केवळ एकच खाजगी लॅब उपलब्ध असल्याने HRCT मशीनची उपलब्धता करुन द्यावी त्याचप्रमाणे रेमडेसीवीर इंजेक्शन,रुग्णांना लागणारा ऑक्सिजन याचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे यासाठी तात्काळ उपयायोजना कराव्यात.अँटीजन चाचणीची वेळ वाढवावी,HRCT चाचणी कमी दरामध्ये उपलब्ध करुन द्यावी.मतदार संघासाठी कार्डीयाक अँम्बुलन्स उपलब्ध करुन द्यावी त्याचप्रमाणे संशयीत रुग्णांना विलगीकरण कक्ष नसल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत आहे यासाठी गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरु करावे त्यावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण असावे.शिर्डी येथे सुरु असलेले कोवीड सेंटरमध्ये कोपरगांव तालुक्यातील रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी तेथील प्रशासनाला सुचना कराव्यात. अशा विविध मागण्या सौ कोल्हे यांनी मांडल्या.
    नुकत्याच राज्य सरकारने जाहीर केलेल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत या कामासाठी निधीची उपलब्धता करुन देऊन तातडीने या उपाययोजना करण्याची मागणी सौ.कोल्हे यांनी केली.यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित जिल्हाधिकारी यांना याबाबत सुचीत करुन या मागण्यांचा गांभीर्याने  विचार करावा असे सांगितले.चौकट-कोपरगांव तालुक्यातील कोरोनाने जनता हैरान झाली असून त्याकरीता शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करुन जनतेला दिलासा द्यावा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी म्हणून माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांचे निवेदनही सौ.कोल्हे यांनी पालकमंत्री यांना दिले

Post a Comment

0 Comments