आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात लोकसहभागातून ऑक्सिजन प्लांट होऊ शकतो ------ विजय वहाडणे

 कोपरगावात लोकसहभागातून ऑक्सिजन प्लांट होऊ शकतो

      ------   विजय वहाडणे




कोपरगांव प्रतिनिधी:-----
पुण्यातील उद्योजक, हॉस्पिटल्स, दानशूर व्यक्ती, संस्था यांनी एकत्र येऊन पुणे शहरासाठी 14 ऑक्सिजन प्लांट खरेदी करण्याचा निर्णय घेऊन विविध ठिकाणी ते प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

           कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आपणही असा एक ऑक्सिजन प्लांट उभारू शकतो का? याचा विचार करायला हरकत नाही. कारण येथून पुढच्या काळात कोरोना व असेच जीवघेणे आजार बळावले तर ऑक्सिजनची कायमच गरज भासेल असे वाटते. असा प्लांट उभारल्याने कोपरगाव व आसपासच्या तालुक्यातील गरजूंना उपयोग होऊ शकतो. कायमस्वरूपी सोय होईल. शहर व तालुक्यातील उद्योजक, मोठी रुग्णालये सहकारी संस्था, पतसंस्था, दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन सर्वांच्याच सोयीसाठी ऑक्सिजन प्लांट उभारावा नंतर औद्योगिक वापरासाठीही तो उपयोगी पडू शकतो. आ.आशुतोषजी काळे, श्री.बिपिनराव कोल्हे, श्री. राजेशजी परजणे श्री. कैलासशेठ ठोळे, अनेक नामवंत उद्योजक, काका कोयटे, बँका-पतसंस्था, मोठे हॉस्पिटल्स, ज्ञात अज्ञात दानशूर व्यक्तीनी एकत्र येऊन निर्णय घेतला तर कोपरगावसाठी ऑक्सिजन प्लांट उभा करणे अवघड नाही असे वाटते. नागरीकही आपापल्या परीने हातभार लावतीलच यात शंका नाही. प्रत्येक बाबतीत शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण एकजुटीने उभे राहिलो तर सर्वांनाच उपयुक्त असे काम उभे राहिल.        

        

      

Post a Comment

0 Comments