आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

१३ एप्रिलपासून डाव्या उजव्या कालव्याला आवर्तन सुटणार. डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला १३.५ कोटी निधी मंजूर :आमदार आशुतोष काळे.

 १३ एप्रिलपासून डाव्या उजव्या कालव्याला आवर्तन सुटणार.

डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला १३.५ कोटी निधी मंजूर :आमदार आशुतोष काळे.

     

         

कोपरगाव प्रतिनिधी:----  गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दोन उन्हाळी आवर्तन देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे जलसंपदामंत्री ना.जयंतरावजी पाटील यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या झालेल्या बैठकीत गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याला १३ एप्रिलपासून एकाचवेळी दोनही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. तसेच शंभरी पार केलेल्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी जलसंपदामंत्री ना.जयंतरावजी पाटील यांनी पहिल्या टप्प्यातील १३ कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.  

               जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूस कोणत्याही प्रकारचे बंधारे न बांधणेबाबत जलसंपदा विभागाने काढलेला आदेश शिथिल करणेबाबत व कोपरगाव तालुक्यात बंधारे बांधण्यास परवानगी मिळणेबाबत विचारविनिमय करणेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सिंचनासाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली. सदर मागणीचा विचार करून १३ एप्रिलपासून डाव्या व उजव्या कालव्याला एकाचवेळी दोनही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. दोनही उन्हाळी आवर्तन एकाचवेळी सोडण्यात येणार असल्यामुळे १५ जूनपर्यंत डावा व उजवा कालवा वाहणार असून त्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेती सिंचनाबरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा मंजूर बंधाऱ्याच्या विषयाला हात घालून मंजूर बंधाऱ्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत आग्रह धरला तसेच मतदार संघामध्ये बंधारा कम पूल बांधण्याची मागणी केली. यामध्ये वडगाव कानळद, मंजूर, माहेगाव देशमुख, हिंगणी, डाऊच खुर्द, सडे, शिंगवे व पुणतांबा याठिकाणी बंधारा कम पूल बांधल्यास पावसाळ्यात पाणी साठविले जाऊन त्या पाण्याचा उन्हाळ्यात सिंचनासाठी उपयोग होऊ शकतो व त्याचबरोबर पूल बांधल्यास दळणवळणाचा मोठा प्रश्न देखील मार्गी लागून त्याचा मोठा फायदा नागरिकांना होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.  

              शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून कालव्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे कालव्यांचे मजबुतीकरण व दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. गोदावरी कालव्यांचे मजबुतीकरण अथवा नव्याने बांधकाम करणे गरजेचे असून त्यासाठी ६०० कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. त्यापैकी ७८ कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आलेले आहेत. त्या प्रस्तावांपैकी या बैठकीत डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यातील १३ कोटी ०५ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. व पुढील निधी देखील तातडीने उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री ना.जयंतरावजी पाटील यांनी दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.  

          चौकट :- गोदावरी कालव्यांचा पाणी प्रश्न हा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते हि लढाई  लढत होते. त्यामुळे पाणी प्रश्न व कर्मवीर शंकररावजी काळे साहेब हे जणूकाही समीकरण होवून बसले होते. त्यांच्या नंतर मला देखील हि लढाई लढण्याचे भाग्य मिळाले. आज हा लढा आ. आशुतोष काळे लढत आहे. आज त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले असून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांची १०० वी जयंती व आजच डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी १३.५ कोटी रुपये निधी जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील यांनी मंजूर केले हि कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना खरीखुरी सुमनांजली आहे.- मा.आ. अशोकराव काळे

Post a Comment

0 Comments