आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात विकेंन्ड लाॅकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद शासनाचे नियम गांभीर्याने पाळा पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे आवाहन.

 कोपरगावात विकेंन्ड लाॅकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

शासनाचे नियम गांभीर्याने पाळा पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे आवाहन.कोपरगाव प्रतिनिधी:------
शहरासह तालुक्यात विकेन्ड लाॅकडाऊनला वैद्यकीय कामासाठी तुरळक वाहतूक वगळता शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला परंतु अद्यापही काही नागरिक शासनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसले असता विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कारवाई केली.शहरातील मेनरोड परिसर ,साईबाबा नाका,अण्णाभाऊ साठे पुतळा आदि भागातील इतर वेळेला गजबजलेले रस्ते मात्र आज विकेन्ड लाॅकडाऊनला निर्मनुष्य दिसत होते यावेळी नियम मोडणाऱ्या नागरिकांना पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कारवाई केली तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की,वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच राहणे जास्त महत्त्वाचे आहे घरात रहाल तर सुरक्षित राहाल लाॅकडाऊन हे आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे कोरोनाच्या थैमानामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे आज परिस्थिती अतिशय गंभीर बनत चालली आहे त्यामुळे सर्वांनी  कडक लाॅकडाऊन पाळणे महत्त्वाचे आहे असे ते यावेळी म्हणाले

सध्या कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या दिवासेंदिवस वाढत असूनआज नागरिकांनी जसे सहकार्य करून शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉक डाउन ला प्रतिसाद दिल्यास वाढत्या रुग्ण संख्येला आला बसेल यात काही शंखा नाही. जनवार्ता न्यूज च्या वतीने नागरिकांना जाहीर आव्हान शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा.

Post a Comment

0 Comments