Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

लोकप्रतिनिधींचे नियोजन शुन्य तर जलसंपदा खात्याचे ढिसाळ कारभारामुळे हवालदिल झालेला शेतकरी रस्त्यावर उतरणार - सौ. स्नेहलता कोल्हे

 लोकप्रतिनिधींचे नियोजन शुन्य तर जलसंपदा खात्याचे ढिसाळ कारभारामुळे

हवालदिल झालेला शेतकरी रस्त्यावर उतरणार - सौ. स्नेहलता कोल्हे


कोपरगांव प्रतिनिधी:------ रब्बी हंगामात पिकांना पाण्याची फार आवश्यकता असतांना देखील जलसंपदा खात्याने उन्हाळी रोटेशनचे आवर्तनाचे तारखा वेळेवर जाहिर न केल्यामुळे कांदा व गहु यांना एका पाण्याची गरज असतांना ते वेळेवर मिळाले नाही त्यामुळे सर्व शेतक-यांचे नियोजन कोलमंडले आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधी यांनी नियोजन करणे गरजेचे असतांना देखील शेतक-यांचा महत्वपूर्ण असलेला पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्षामुळे तसेच जलसंपदा खात्याचे ढिसाळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचा अंत पाहु नका अन्यथा शेतकरी बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेषसचिव, माजी आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.

मागील वर्षी चांगला पाऊस झाला धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने शेतकरी बांधवांनी ऊसाची व फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. पाटबंधारे खात्याकडून उन्हाळ्यात किमान तीन आवर्तने हे मिळतीलच अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. एप्रिल महिना सुरु होवुन देखील आवर्तनाची तारखा पाटबंधारे विभागाने जाहिर केलेल्या नाही. विहीरींच्या  पाण्याने तळ गाठला तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने सध्या पिकांना देखील पाण्याची खुपच गरज आहे. उभे पिक हे डोळयासमोर जळत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. धरणात पाणीसाठा मुबलक असतांना देखील पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी यांनी आवर्तन बाबतचे योग्य नियोजन करणे गरजेचे असतांना देखील पाणी न मिळाल्याने शेतकरी बांधव पाणी मिळण्याची मागणी करत आहे. 
मागील वर्षी उन्हाळी आवर्तन व पाऊस एकाच वेळेस सुरु झाला होता. परंतू मागील वर्षी उन्हाळी पीके कमी असल्याने पाणी मागणी कमी होती. यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. पाणी मागणी वाढलेली आहेत  धरणातही पाणीसाठा पुरेशा प्रमाणात असल्याने मार्चमध्येच उन्हाळी पहिले आवर्तन द्यायलाच पाहिजे होते परंतू याबाबत कुठेही व कोणीही दखल न घेतल्याने सध्याचे आवर्तन सुरु होईपर्यंत शेतक -यांची पीके हि हाता बाहेर गेली व पिकांची मोठे नुकसान झाले. 
कोरोना या विषाणूमुळे देशासह राज्याची सर्व अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले त्यांनी शेतात उत्पादीत केलेल्या मालाला भाव नाही, व त्यातच विक्री केल्यास त्यांचा खर्च देखील निघत नाही अषी दयनीय अवस्था शेतकरी बांधवांची झालेली आहे. त्याचबरोबर वादळीवारा, गारपीट, अतिवृष्टीमुळे अनेक मोठया पिकांचे नुकसानीचे झालेले आहे. वेगवेगळे संकट शेतकरी बांधवांवर येत असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हा निघुन गेला तरी पण शेतकरी आजही उन्हा तान्हात काबाड कष्ट करत आहे. जगाचा पोशींदा म्हणुन ओळखले जाणारे शेतकरी बांधवांनी जगायचे तरी कसे ?. उषिरा म्हणजे 15 एप्रिल रोजी उन्हाळी रोटेषन सोडण्यात आले रोटेषन सोडुन 15 दिवस झाले तरी शेतक-यांपर्यंत अद्यापही पाणी पोहचलेले नाही, सर्वांना कॅनलच्या  माध्यमातुन दिसत असलेले पाणी मुरते तरी कुठे याचा शोध घेणे गरजेचे ठरणार आहेत, लोकप्रतिधी व जलसपंदा खात्याने शेतक-यांचा अंत पाहु नका अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याषिवाय राहणार नाही असा इषारा सौ. कोल्हे यांनी दिला आहे. 
















Post a Comment

0 Comments