आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळेंनी केलेल्या नियोजनातून रुग्णसंख्या नियंत्रणात येईल: नामदार हसन मुश्रीफ

 आमदार आशुतोष काळेंनी केलेल्या नियोजनातून रुग्णसंख्या नियंत्रणात येईल: नामदार हसन मुश्रीफ

कोपरगाव तालुक्यासाठी ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा करावा: आमदार आशुतोष काळे

            



कोपरगाव प्रतिनिधी:----- काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणात वाढला असून अहमदनगर जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. महाविकास आघाडी सरकार कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांनी जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करून बाधित रुग्णांची मोठी अडचण दूर केली आहे. त्यांनी केलेल्या उपाययोजनाकरीत असलेल्या नियोजन व राबवीत असलेल्या उपक्रमातून कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या लवकरच कमी होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे  सुरु करण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरची पाहणी व कोरोना बाबतचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना.हसनजी मुश्रीफ कोपरगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जम्बो कोविड सेंटरची पाहणी करून समाधान व्यक्त करून कृष्णाई मंगल कार्यालय येथे आढावा बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले किकोरोना संकट हे कोणा एका व्यक्तीवर आलेले नसून संपूर्ण मानव जातीवर आलेले संकट आहे. त्यासाठी सामुदायिक प्रयत्नातून या संकटाशी लढावे लागणार आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहे. मात्र तोपर्यंत आपण सर्वांनी स्वतःला व आपल्या कुटुंबाला जपावे. ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांनी सक्रीय होऊन या संकटाशी लढण्यासाठी योगदान द्यावे. आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या मागणीचा विचार करून कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा सुरळीत करून देणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले किकोपरगाव तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्ण संख्येचा विचार करून कोपरगाव तालुक्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एस.एस.जी.एम.महाविद्यालयात १०० ऑक्सिजन बेड व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. परंतु ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांची टंचाई जाणवत आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कोपरगाव विधानसभा मतदार संघाला करण्यात यावा व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला अंबुलन्स मिळावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी पालकमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांच्याकडे केली असता पालकमंत्र्यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले साहेबपोलिस अधीक्षक डॉ. मनोज पाटील साहेबखासदार सदाशिव लोखंडेमाजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणाप्रांताधिकरी गोविंद शिंदेपोलिस उपअधीक्षक संजय सातवपंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधनेउपसभापती अर्जुन काळेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,नगराध्यक्ष विजयराव वहाडणेशिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरेमुख्याधिकारी प्रशांत सरोदेकोपरगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधवकोपरगाव शहराचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसलेगटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशीग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदरतालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधातेनायब तहसीलदार मनिषा कुलकर्णीडॉ. वैशाली बडदेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पेमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचानगरसेवक गटनेते विरेन बोरावके ,मंदार पहाडेअजीज शेख,डॉ. योगेश कोठारीडॉ. तुषार गलांडेनारायण लांडगेनिखिल डांगेचंद्रशेखर म्हस्केशहरप्रमुख कलविंदर सिंग डडियालयुवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटेभरत मोरेसुनील साळुंकेनितीन शिंदेअनिल गायकवाडसंतोष गंगवाल आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments