आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

आमदार आशुतोष काळे सॅनिटायझर घेवून जनतेच्या दारी

 --आमदार आशुतोष काळे सॅनिटायझर घेवून जनतेच्या दारी

       


        

कोपरगाव प्रतिनिधी:-----  मागील महिन्यापासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता मागील वर्षीच्या तुलनेत अधिक तीव्र असून कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील वर्षी कोरोना संसर्ग रोखण्यामध्ये  मास्क, सोशल डीस्टन्सिंग याबरोबरचसॅनिटायझरने अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे यावर्षी कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जनतेचे कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर देण्याचा निर्णय घेऊन स्वत:च्या हाताने मंगळवार (दि.६) रोजी जनतेच्या दारी जावून नागरिकांना सॅनिटायझर वाटप केले आहे. त्यामुळे मतदार संघासह जिल्ह्यत हा चर्चेचा विषय झाला आहे.

               मागील वर्षी विदेशातून आलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण विश्वाला गुडघे टेकायला भाग पाडले. अकस्मात आलेल्या या संकटाचा सामना करतांना व या आजारावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधात्मक ठोस औषध उपलब्ध नसतांना विश्वाने केलेल्या उपाय योजनांचा अवलंब करून मागील वर्षी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनावर चांगल्या प्रकारे नियत्रण मिळविले. मात्र मागील महिन्यापासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत आलेल्या  दुसऱ्या लाटेमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. विदेशाच्या वेशीवरून जीवघेणा कोरोना विषाणू आज गावागावातील कुटुंबाच्या दारापर्यंत येवून पोहोचला आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवून कोरोना संकटापासून जनतेचा बचाव व्हावा या उद्देशातून त्यांनी जनतेच्या दारी जावून नागरिकांना सॅनिटायझर तर वाटप केलेच त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रत्येक कुटुंबाची आपुलकीने चौकशी करून घाबरू नका, कोणताही आजार अंगावर काढू नका, तातडीने आरोग्य तपासणी करून उपचार घ्या असा सल्ला दिला त्यामुळे कोरोना संकटात नागरीकांना दिलासा मिळाला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघात एकूण  ८०,००० कुटुंब असून या प्रत्येक कुटुंबापर्यंत आमदार आशुतोष काळे सॅनिटायझर पोहोचवणार आहे.

     चौकट :- विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सहा महिन्यातच जागतिक कोरोना महामारीने मागील वर्षी सर्व काही ठप्प केले. मात्र तेव्हापासून आजतागायत आमदार आशुतोष काळे एकही दिवस घरात बसले नाही. जनतेसोबत राहून जनतेला सोबत घेवून कोरोना संकटाशी मुकाबला करून मतदार संघाची विकास कामे सुरु ठेवून कोरोना संकटात देखील मतदार संघाचा विकासाचा आलेख चढता ठेवला. कोरोना संकटाचा वाढता संसर्ग पाहून जनतेला स्वत: सॅनिटायझर वाटप करून जनतेची काळजी घेणारा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे आमदार आशुतोष काळे यांनी दाखवून दिले आहे.

Post a Comment

0 Comments