आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

पिके जळून गेल्यावर आवर्तन सोडणार का? सौ स्नेहलता कोल्हे.

 पिके जळून गेल्यावर आवर्तन सोडणार का? 

सौ स्नेहलता  कोल्हे.



कोपरगाव प्रतिनिधी:------
गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील पिके पाण्या अभावी जळून जात असतांना लोकप्रतिनिधिंच्या दुर्लक्षामुळे सिचंन व्यवस्थेचा पुर्णपणे खेळखंडोबा झाला असून शेतक-यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे, उभी पिके हातातून गेल्यावर आवर्तन सुटणार का ? असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी उपस्थित केला.
गोदावरी कालव्यांना शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार! याकडे शेतकरी डोळे लावून बसले असतांना अदयापही आवर्तन सुटत नसल्याने लाखो रूपये खर्च करून शेतात उभी असलेली पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत.लोकप्रतिनिधींच्या  सिंचन व्यवस्थेकडॆ झालेल्या दुर्लक्षामुळे आवर्तन सुटण्यास उशीर झाला आहे, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हाती आलेली पिके जळून गेल्यावर शेतीचे आवर्तन सुटले तर त्याचा फायदा होणार का? हाही प्रश्नच असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या.
येत्या 13 तारखेला दोन रोटेशन सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना पिके जळू दयायचे आणि नुकसानीनंतर एकाच वेळी दोन आवर्तने देउ म्हणून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. मागील सरकारच्या काळात कालवा सल्लागार समितीच्या बैठका मंत्रालयात होतात, म्हणून मोठे आकाडतांडव केले, या सरकारच्या काळात मतदार संघात बैठका घेउन सत्कार घडवुन थाटमाट केला, मात्र सिंचनाच्या आवर्तन विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून येथील शेतकरी वा-यावर सोडण्याचे काम केले आहे. आवर्तन विषयावर टोलवाटोलवी केली, त्याचवेळी शेतक-यांविषयीचे तुमचे बेगडी प्रेम उघडे झाले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठका दिल्लीत घ्या, मुंबईत घ्या अन्यथा कुठेही घ्या. पण शेतक-यांना वेळेवर आवर्तने दया, अशी आर्त हाक शेतकरी करत असल्याने त्यांना भुलविण्याचे पाप आता करू नये,असेही सौ कोल्हे म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments