आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगावात उद्या पासून मिनी लॉकडाऊन फक्त अत्यावश्यक सेवा राहणार सुरु ! मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली माहिती.

कोपरगावात उद्या पासून मिनी लॉकडाऊन फक्त अत्यावश्यक सेवा राहणार सुरु !
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली माहिती.





कोपरगाव प्रतिनिधी:------ 
संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे कोपरगाव शहरात आज दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता शहरात मिनी लॉक डाऊन असणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना सरोदे म्हणाले कि काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्या प्रमाणे 'ब्रेक द चेन ' या मिशन अंतर्गत ५ एप्रिल संध्याकाळी ८ वा. पासून ते ३० एप्रिल रात्री १२ वा . पर्यंत लॉक डाऊनचे निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सकाळी ७ ते रात्री ८ वा. पर्यंत जमाव बंदी आदेश लागू असेल . आणि रात्री ८ वा. पासून सकाळी ७ वा. पर्यंत संचार बंदी लागू असेल . या कालावधीदरम्यान नागरिकांनी अत्यावश्यक सेवेच्या कारणाशिवाय बाहेर पडू नये . असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले . यादरम्यान दवाखाने , मेडिकल, किराणा दुकाने , भाजीपाला , बेकरी, मिठाईचे दुकाने इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरु असतील . शेती विषयक कामे, दुकाने , वाहतूक सुरु राहीतील . खाजगी व सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु राहतील मात्र त्यांना सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळावे लागतील .बँका व इतर वित्तीय संस्था वगळता सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील खाजगी संस्थांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक राहील. शासकीय कार्यालये सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पळून सुरु राहतील. वृत्त पत्रे छपाई व वितरण सुरु राहतील . उद्योग , कारखाने कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊन चालू असतील . इमारत बांधकामे सुरु असतील मात्र त्या सर्व कामगार मजुरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी मालक ठेकेदाराची राहील .विवाह लग्न कार्यास ५० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल , अंत्यविधीस केवळ २० व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.

बंद असणाऱ्या आस्थापनांमध्ये चित्रपट गृह ,जलतरण तलाव , वॉटर पार्क , सभागृहे, बगीचे, क्रीडा संकुले , क्लब , व्यायामशाळा , इत्यादी पूर्णतः बंद राहतील या व्यतिरिक्त असणारे सर्व दुकाने बाजारपेठ तसेच मॉल बंद राहतील . तसेच सर्व धर्मीय पार्थना स्थळे पूजे व्यतिरिक्त बंद असतील . रेस्टोरंट , हॉटेल , परमिट रूम पूर्णपणे बंद असतील रेस्टोरंट मध्ये केवळ पॅकिंग पार्सल खाद्यपदार्थ विक्रीस सकाळी ७ ते रात्री ८ वा. पर्यंत परवानगी असेल. रस्त्याकडेच्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्याही पार्सल खाद्यपदार्थ विकू शकतात. सर्व सलून ब्युटी पार्लर,स्पा पूर्णपणे बंद राहतील . शाळा , महाविद्यालये, खाजगी शिकवण्या , पूर्णपणे बंद असतील केवळ १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी यातून सूट असेल .

त्याच प्रमाणे ज्या सोसायटीमध्ये ५ अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडल्यास ती सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येईल. आणि आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी रात्री १२ वा. पासून ते सोमवारी सकाळी ७ वा. पर्यंत पूर्णतः लॉक डाऊन असेल या दरम्यान अत्यावश्यक सेवा कारणास्तव कोणीही बाहेर पडू नये. यादरम्यान नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याव्यतिरिक्त दंडात्मक कारवाई करण्यात येईल . याव्यतिरिक्त कानी नवीन आदेश आल्यास वेळोवेळी नागरिकांना सूचित करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी सरोदे यांनी दिली . यादरम्यान सर्व नागरिकांनी नियम पाळून नगरपालिकेला सहकार्य करावे . आणि कोरोनाला अटकाव करावे असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.


Post a Comment

0 Comments