आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सामाजिक बांधिलकीचे बाळकडू कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांकडून मिळाले -आमदार आशुतोष काळे

 230.95 kB

सामाजिक बांधिलकीचे बाळकडू कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांकडून मिळाले

                          -आमदार आशुतोष काळे

        


कोपरगाव प्रतिनिधी:-----  समाज अडचणीत असतांना समाजाच्या मदतीला नेहमीच धावून जाणाऱ्या माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आजीवन समाजहिताचा विचार आपले संपूर्ण जीवन समाजासाठी वेचलं. त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण, पाणी, सहकार व सामाजिक क्षेत्रात बजावलेली कामगिरी अजोड आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हि शिकवण  आजोबा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी  परिवाराला दिली व त्यांच्याकडूनच सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.               

               कोसाका उद्योग समुहाचे शिल्पकार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली यावेळी आमदार आशुतोष काळे बोलत होते. यावेळी १०० व्या जयंतीचे औचित्य साधत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरणासाठी घेवून जाणाऱ्या मोफत बससेवेचा शुभारंभ माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपोस्थितीत आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला.

                      याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे, आयांश काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे,सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, सर्व सदस्य, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ तसेच गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, पद्मश्री शरदराव पवार पतसंस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,जी.प. सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक व सर्व संलग्न संस्थांचे पदाधिकारी सोशल डीस्टन्सिंग ठेवून उपस्थित होते.

               यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत आहे. अशा परिस्थितीत समाजाला आधार देणं हे माझे प्रथम कर्तव्य आहे. समाजालाच आपलं कुटुंब मानणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०० व्या जयंतीनिमित कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व कुटुंबाना मोफत सॅनिटायझर व ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती कशीही असो अशा परिस्थितीत आपली बांधिलकी समाजाशी असावी हे साहेबांनी शिकविले आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा आदर्श समोर ठेवून आजवर मी माझ्या व्यक्तिगत जीवनात दुःखापेक्षा समाजहिताला नेहमी प्राध्यान्य देत आलो आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत समाजाप्रती असलेलं कर्तव्य पार पाडण्याला प्राधान्य देवून मतदार संघातील जनतेला सोबत घेवून कोरोनाच्या लढाईत सर्व ताकदीशी सक्रीय झालो आहे. मागील वर्षी देखील कोपरगावच्या जनतेसोबत कोरोना संकटाशी मुकाबला करून कोरोनावर वर्चस्व मिळविले होते. मात्र मागील एक महिन्यापासून कोरोनाने पुन्हा नव्या जोमात सुरु केलेले तांडव चिता वाढविणारे असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. मी सदैव आपल्या पाठीशी आहे. यावर्षी मास्क, सोशल डीस्टन्सिंग,सॅनिटायझर बरोबरच आपल्याकडे कोरोना प्रतिबंधक लसीचे सुरक्षा कवच आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण पुन्हा एकदा कोरोना संकटावर वर्चस्व प्रस्थापित करू असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. वैश्विक कोरोना महामारीने संपूर्ण विश्वाला बेजार केले असले तरी  त्यावर मात करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेवून जनतेला अपेक्षित असलेली विकासाची कामे मार्गी लावून जनतेला कठीण काळात आधार देण्यास मी अखंडपणे बांधील असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी यावेळीकेले 

Post a Comment

0 Comments