आमदार आशुतोष काळेंनी पदरमोड करून दिले एक हजार टेस्टिंग किट
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:------- कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे त्यामुळे आरोग्य विभागाला टेस्टिंग किटचा काहीसा तुटवडा जाणवत होता. कोरोना संकट आल्यापासून आमदार आशुतोष काळे आरोग्य विभाग व प्रशासनाला वेळेत सर्वोतोपरी मदत करीत आहे.मतदार संघातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाला कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही हा दिलेला शब्द आमदार आशुतोष काळे यांनी खरा करून दाखवत पदरमोड करून आरोग्य विभागाला तपासणीसाठी एक हजार टेस्टिंग किट उपलब्ध करून दिले आहे.
मागील महिन्यापासून कोपरगाव तालुक्यात कोरोणाचा उद्रेक मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. रोज बाधित रुग्णांच्या संपर्कातील शेकडो रुग्णांची तपासणी केली जात आहे. यामध्ये कोपरगाव ग्रामीण रुग्णालय तसेच मतदार संघातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बाधित रुग्णांच्या संपर्कातील शेकडो नागरिकांच्या तपासण्या केल्या जात आहे. रोज मोठ्याप्रमाणात तपासण्या होत असल्यामुळे टेस्टिंग किटची टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती त्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात आमदार आशुतोष काळेंनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांना देखील भेटले होते व टेस्टिंग किटची कमतरता पडू देऊ नका अशी विनवणी केली होती. त्यांच्या माध्यमातून लवकरच कोपरगाव तालुक्यासाठी टेस्टिंग किटचा पुरवठा होणार आहे. मात्र सध्या तात्पुरत्या स्वरुपात उद्भवलेली टेस्टिंग किटची टंचाई दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पदरमोड करून १ हजार टेस्टिंग किट आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या आहे. या टेस्टिंग किट ग्रामीण रुग्णालय तसेच सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पोहोच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी येत असलेली टेस्टिंग किटची अडचण आमदार आशुतोष काळे यांच्या उदार भावनेतून दूर झाली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला तातडीने एक हजार टेस्टिंग किट उपलब्ध करून दिल्याबद्दल तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, डॉ.कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्याधिकारी संतोष विधाते, डॉ.वैशाली आव्हाड यांनी आभार मानले आहे. या टेस्टिंग किट आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांनी आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या. यावेळी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरखनाथ जामदार, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे आदी उपस्थित होते.

0 Comments