आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

नियमाचे उल्लंघन केल्याने पालिकेने केले शहरातील दोन नामांकित हॉटेल ७ दिवसांसाठी सील

 नियमाचे उल्लंघन केल्याने पालिकेने केले शहरातील दोन नामांकित हॉटेल ७ दिवसांसाठी सील

शासनाने दिलेले नियम पाळून सहकार्य करा---मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे आवाहन.
कोपरगाव प्रतिनिधी:-----

कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचे पथक शहरात फिरत असतांना स्वा.सावरकर चौक येथील हॉटेल रसराज व गुरुद्वारा रोड येथील हॉटेल रसरंग या दोनही हॉटेल अस्थपणा यांना फक्त पार्सल सुविधा देणेबाबत निर्बंध असून ही या दोन्ही अस्थापना यांनी नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आले. तपासणीदरम्यान पथकांनी यावर कारवाई करून सदर दोन्ही अस्थापना सात दिवसासाठी  नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचे पथक शहरात फिरत असतांना स्वा.सावरकर चौक येथील हॉटेल रसराज व गुरुद्वारा रोड येथील हॉटेल रसरंग या दोनही हॉटेल अस्थपणा यांना फक्त पार्सल सुविधा देणेबाबत निर्बंध असून ही या दोन्ही अस्थापना यांनी नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आले. तपासणीदरम्यान पथकांनी यावर कारवाई करून सदर दोन्ही अस्थापना सात दिवसासाठी सील ( बंद ) केली.

कोरोना संसर्गाची दुसरीलाट अतितीव्र स्वरुपात असून यामध्ये दैनदिन कोरोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध अमलबजावणी कामी “ब्रेक द चेन” मिशन अंतर्गत मा.जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे आदेश क्र. DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक ४ एप्रिल २०२१ नुसार दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ यादरम्यान जमावबंदी लागु राहील. ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू शकणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तर रात्री ८ ते सकाळी ७ यादरम्यान संचारबंदी असेल यावेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरू नये. 

सदर आदेशा नुसार दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान शहरातील वैद्यकीयसेवेसह अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवणे बाबत आदेशित केले आहे.  त्यानुसार संपूर्ण शहरभर रिक्षा द्वारे अलौन्सिंग करून नागरिक, व्यापारी यांच्या मध्ये दि.४ ते ६ एप्रिल २०२१ या तीन दिवस जनजागृती करण्यात आली होती. 

आज दिनांक ०९ एप्रिल २०२१ रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विविध भरारी पथके करून शहरातील मार्केट भाग, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बँक रोड, मंगलकार्यालय विविध भागात धडक मोहिमी राबवली. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सुरु असलेल्या सेवा, छोटे व्यवसायिक व नागरिक यांना समुपदेशना / चर्चे द्वारे इतर अस्थापना बंद करून सहकार्य करावे असे आवाहन केले.

“ब्रेक द चैन” यामोहिमेअंतर्गत नागरिक व्यापारी यांचे त्यांच्याशी संवाद साधून जाणीव जागृती निर्माण करून कोरोना प्रादुर्भाव रोखणे कामे सर्वांनी सहकार्य करावे या करिता शासन व प्रशासन विविध उपाय योजना राबवत असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावेअसे आवाहन नगरपरिषद प्रशासना मार्फत करण्यात येत आहेPost a Comment

0 Comments