आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

संजीवनीने पुढाकार घेत कोविड केअर सेंटर सुरू केल्याने रूग्णांना दिलासा मिळणार:--माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे

   संजीवनीने पुढाकार घेत कोविड केअर सेंटर सुरू केल्याने रूग्णांना दिलासा मिळणार:--माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी:------ 

कोरोना सारख्या वैश्विक  महामारीमुळे जगासह, देश  ठप्प झाला असुन राज्यातील जनजीवनही विस्कळीत झालेली आहे. कोपरगाव तालुक्यातील या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढलेली आहे. या परिस्थितीत रूग्णांना आॅक्सीजन,  इंजेक्शन  तसेच बेड  उपलब्ध होत नाही, रूग्णांची व नातेवाईकांची मोठी हेळसांड होत असून अपु-या सुविधांअभावी उपचार घेणे जिकरीचे बनले आहे. ही सर्व परिस्थिती डोळयासमोर ठेवुन  संजीवनीने पुढाकार घेत कोविड केअर सेंटर सुरू केल्याने रूग्णांना दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी केले.

कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात संजीवनी दयोग समुहाच्या वतीने सुमारे ४०० बेडच्या कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरची पहाणी सौ कोल्हे यांनी केली, यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, संजीवनी शैक्षणिक संकुलाचे अमितदादा कोल्हे, अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे, सुमित कोल्हे संजीवनीचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे,वैद्यकीय अधिकारी डाॅ कृप्णा फुलसुंदर, डाॅ वैशाली बडदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ संतोष विधाते, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,वासुदेव देसले, वैद्यकीय  असोसिएशनचे डाॅ महेंद्र गोंधळी, सुशांत घोडके आदी उपस्थित होते.

यावेळी सौ कोल्हे पुढे म्हणाल्या, समाजावर आलेल्या संकटाच्या वेळी  संजीवनी परिवार नेहमीच अग्रभागी राहिला आहे. तालुक्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पहाता रूग्ण व नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने या संख्या आटोक्यात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नषील राहिलो आहे. संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारा बरोबरच मानसिक आधार देण्याचे काम येथुन होणार आहे. या कोविड सेंटरमध्ये रूग्णांसाठी  पौष्टिक हाराबरोबर वैद्यकीय मार्गदर्शन, औषधे, वाफेचे मशिन, अंडी, आयुर्वेदिक काढा, हळदीचे दुध याबरोबर मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराबरोबरच रूग्णांला सकारात्मक उर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना रूग्णाला एकटे पडल्याची भावना नेहमी जाणवते, त्यासाठी त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले व उत्तम राहणे गरजेचे आहे, त्याकरीता सर्व प्रयत्न या कोविड सेंटरमध्ये राबविण्यात येणार आहे.
या कोविड सेंटरमधून अनेक रूग्ण लवकर बरे व्हावेत,हीच मनस्वी इच्छा आहे, परंतु दुर्दैवाने एखादया रूग्णाला अन्यत्र हलविण्याची आवश्यकता भासली तर त्यांनी वैदयकीय सहायता केंद्राद्वारे रक्तपेढया, आॅक्सीजन बेड आदी सुविधा असलेल्या रूग्णालयांची माहितीही याठिकाणाहून देण्यात येणार असून  लवकरच स्वतंत्र आॅक्सीजन बेंडची सुविधाही याठिकाणी उपलब्ध करून देणार असल्याचे सौ कोल्हे म्हणाल्या. यावेळी संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधीत रूग्णांना सेवा देणा-या विविध कर्मचा-यांचा आरोग्य विमाही संजीवनी उद्योग  समुहाच्या वतीने काढण्यात आला, त्याचे प्रमाणपत्र उपस्थित अधिका-यांच्या हस्ते कर्मचा-यांना प्रदान करण्यात आले.                  
 रूग्णांनी मानले संजीवनीचे आभार
संजीवनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध केलेल्या सुविधांची रूग्णांना निश्चितच बरे करण्यास मदत होईल, या ठिकाणी दाखल असलेल्या रूग्णांनी सौ कोल्हे यांचेशी संवाद साधत समाधान व्यक्त

Post a Comment

0 Comments