आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राहता तालुक्यातत फक्त एका मेडीकल मध्ये रेडमीसिव्हर उपलब्ध अन्न औषध प्रशासनाकडून अन्याय कमलाकर कोते यांचा आरोप


राहता तालुक्यातत फक्त एका मेडीकल मध्ये रेडमीसिव्हर  उपलब्ध  अन्न औषध प्रशासनाकडून अन्याय

   कमलाकर कोते यांचा आरोप


शिर्डी प्रतिनिधी:----
राहाता तालुक्यावर अन्याय सहाय्यक आयुक्त अन्न व औषधे प्रशासन यांनी काल रेडमीसिव्हर ईजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी  जिल्हाभरातील ठराविक मेडिकलची यादी जाहीर करून त्या अनुषंगाने अधिसूचना देखील काढली.. यामध्ये .नगर शहरातील १९ संगमनेर १० कोपरगाव १० श्रीरामपूर २ व राहता तालुक्यातील एक मेडीकल चा उल्लेख आहे सर्व तालुक्यातील कमी अधिक प्रमाणातील मेडिकलचा समावेश केला.. सर्वात जास्त कोरोणा पेशंट राहाता तालुक्यातील शिरडी येथील श्री साईबाबा संस्थानच्या कोवीड सेंटर मध्ये मोफत उपचार घेत आहेत तरी पण शिर्डी सह राहता तालुक्यातील एक ही  मेडिकलचे यांत नाव नाही..मात्र लोणीच्या एका मेडीकल चा समावेश आहे  पेशंट शिरडीला आणि ईजेक्शन लोणीला , हा मोठा अन्याय आहे .. शिर्डी ला  ईजेक्शन मिळु नये  अन्न व औषध प्रशासनला हाताशी धरून कोणी गलिच्छ खेळ  तर खेळत नाही ना अश्या प्रकारची शंका निर्माण झाली आहे.. यांमध्ये सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन हे सुद्धा सहभागी आहे का ?  .जिल्हा अधिकारी  यांनी लक्ष घालण्याची गरज आहे  खा.सदाशिव लोखंडे  यांच्या मार्फत आरोग्य मंत्री .राजेश टोपे  यांच्याकडे सहाय्यक आयुक्त यांची तक्रार करणार केली जाणार आहे . येत्या दोन दिवसांत राहाता व शिर्डी  येथे दहा मेडिकल मध्ये रेमडीसिव्हर ईजेक्शन उपलब्ध झाली पाहिजे अन्यथा वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल  असा इशारा देण्यात आला आहे..याची  शासनाने   गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी. शिवसेनेचे नेते  कमलाकर कोते,निलेश कोते, सचिन चौघुले,डॉ. एकनाथ गोंदकर, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, संजय शिंदे, सचिन कोते, राहुल गोंदकर, अमृत गायके  उमेश शेज्वळ. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस. यांच्या वतीने करण्यात आली आहे


Post a Comment

0 Comments