नागरिकांनी कोणत्याही प्रकारची माहिती न लपवता सहकार्य करावे :--- मुख्याधिकारी प्रशांत सरोदे
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सुरुवात
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----
सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोपरगाव नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मोहिमेच्या माध्यमातून " माझे कुटुंब माझी जबाबदारी " पुढिल ०७ (सात) दिवसात घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण आज सुरू करण्यात आले असुन. यामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीचे तापमान, ऑक्सिजन लेवल, सर्दी खोकला तसेच कोरोना संदर्भातील इतर लक्षणे असल्यास त्या व्यक्तीची दुसऱ्या दिवशी ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मदत होणार आहेत. त्याकरिता मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य अधिकारी सुनील गोरडे व डॉ. गायत्री आहेर यांनी प्रभाग वाईज ३२ टिम तयार केलेल्या असुन सदरील टिम मध्ये, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षक व शिक्षिका यांचा समावेश आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही प्रकारची माहिती न लपवता सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या सह उपमुख्याअधिकारी सुनिल गोरडे यांनी केले आहे
0 Comments