आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोपरगाव तालुक्यात उद्यापासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे – आमदार आशुतोष काळे

 कोपरगाव तालुक्यात उद्यापासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ

नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे
 – आमदार आशुतोष काळे

 
  कोपरगाव प्रतिनिधी:------  कोपरगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मागील वर्षी कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण  कोपरगाव विधानसभा मतदार संघात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली होती त्या मोहीमेचे थोड्याच दिवसात सकारात्मक परिणाम दिसून आले होते व कोरोना बाधित रुग्ण संख्येला आळा बसला होता. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघात उद्या (दि.२९)पासून पुन्हा एकदा माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनी आरोग्य तपासणीस सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
मागील एक महिन्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये कोरोना बाधित रुग्णांची वाढलेली संख्या व कोरोनामुळे काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली असली तरी बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.
तरीदेखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीवर हवे तसे नियंत्रण मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारची महत्वाकांक्षी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविली जाणार आहे. कोरोनाचे मतदार संघातून समूळ उच्चाटन करायचे असेल शेवटच्या कोरोनाबधित रुग्णापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठी मतदार संघातील प्रत्येक कुटूबाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे.मागील वर्षी माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या वतीने नगरपरिषद व ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीला मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो. हेच सहकार्य नागरिकांनी पुन्हा एकदा करून  तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. कुटुंबातील सदस्याला कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक त्रास असल्यास त्याची माहिती बीनदिक्कतपणे सांगावी. या तपासणीच्या माध्यमातून कोरोनाचे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर वेळेत उपचार होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहणार आहे. त्यासाठी कोरोनाला न घाबरता सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य समजून आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी. केले आहे
नागरिकांची आरोग्य तपासणी करतांना तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना एन ९५ मास्क, फेस शिल्ड मास्क,सॅनिटायझर,हँडग्लोव्हज आदी साहित्य उपलब्ध करून देऊन कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा काळजीवजा सूचना केल्या आहेत.
.

Post a Comment

0 Comments