आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

कोविड हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयांनी काळजी घ्यावी -आमदार आशुतोष काळे


कोविड हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयांनी काळजी घ्यावी

-आमदार आशुतोष काळे

            


 कोपरगाव प्रतिनिधी:----  नाशिक येथील महापालीकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत व विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीमुळे अनेक निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून अशा घटनांची पुनरावृत्ती कोपरगाव येथे सुरु असलेल्या कोविड रुग्णालयात होवू नये यासाठी कोविड रुग्णालयांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

                     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधित रुग्णांचे आकडे नवनवे विक्रम करीत आहे. त्यामुळे साहजिकच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण अधिक वाढला असून प्रत्येक कोविड रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा पुरवितांना कोविड रुग्णालयातील यंत्रनेपुढे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत कोविड रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करीत असतांना होत असलेल्या धावपळीमुळे काही दुर्घटना घडू शकतात हे नाशिक येथील महापालीकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गळतीची दुर्घटना व विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेली आग हे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून कोविड रुग्णालयांनी यापुढे अधिक सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. जीवघेण्या महामारीत शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या डेडीकेटेड कोविड सेंटरच्या बरोबरीने कोपरगाव विधान सभा मतदार संघात अनेक ठिकाणी  खाजगी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढत असलेल्या संख्येमुळे अनेक गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असून कित्येक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. अशा संकटकालीन परिस्थितीत प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोविड रुग्णालयांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करीत आहे. मात्र अशा वेळी नजरचुकीने काही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी नाशिक व विरार येथील घडलेल्या घटनांचा गांभीर्याने विचार करून कोविड रुग्णालयांनी अधिक सतर्क राहून रुग्णांची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

     


        

चौकट :-  कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्याचबरोबर गंभीर रुग्णांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडबरोबरच कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवत आहे. मात्र मिळेल त्या ठिकाणाहून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नातून कोविड रुग्णालयांना भासत असलेली ऑक्सिजनची टंचाई देखील लवकरच दूर होवून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल. तसेच गंभीर रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत यासाठी एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात १०० ऑक्सिजन बेडचे काम अंतिम टप्प्यात आले असून ऑक्सिजन बेडची अडचण देखील लवकरच दूर होणार आहे.- आमदार आशुतोष काळे

Post a Comment

0 Comments