आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

शिर्डी हाॅटेल बळकविण्याचा प्रकरणात तलवार पैसे व एटीएम हस्तगत शिर्डी पोलिसांची माहिती

शिर्डी हाॅटेल बळकविण्याचा  प्रकरणात तलवार पैसे व एटीएम हस्तगत 

 शिर्डी पोलिसांची माहिती


शिर्डी प्रतिनिधी:----

 साकुरी/शिर्डी लगत असलेल्या शिवारात असलेल्या भाडेतत्त्वावर दिलेल्या हॉटेल साई तेज  चे मालक मालक यांचे थकित असलेले भाडे 42 हजार रुपये हॉटेल बळजबरीने अनाधिकृतपणे ताबा घेऊन बळकावण्यासाठी तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन चार हजार पाचशे रुपये रोख एटीएम कार्ड ताब्यात घेणाऱ्या सहा जणांच्या विरोधात शिर्डी पुरुषांनी १४एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यात अविनाश अशोक शिंदे व विनोद पवार या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली आहे  त्यांच्याकडून तलवार पैसे एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तपास अधिकारी वैभव रूपवते यांनी दिली

    यातील चार संशयित अद्यापही फरार असून सदरची घटना १४ एप्रिल रोजी घडली होती शिर्डी पोलिसांनी गंभीर दखल घेऊ सहा जणांच्या विरोधात दहा विविध प्रकारचे गुन्हे देखील दाखल केली होती यातील काही संशियतावर या अगोदर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत शिर्डी पोलिसांनी फरार असलेल्या चार जणांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून या गुन्ह्यात वापरलेले फायटर चाकू हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे मात्र घटना घडुन आठ दिवस  झाल्यानंतरही पोलिसांना या चार संस्था चा तपास न लागल्याने बापूसाहेब गायके व त्यांचे कुटुंबीय दहशतीखाली असून आमच्या कुटुंबाच्या जीवाला काही धोका झाला तर काय करणार या भीतीने कुटुंबे धास्तावले असून याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना विचारले असता या घटनेची शिर्डी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून फरार असलेल्या चार संशयितांना देखील लवकरच ताब्यात घेण्यासाठी शिर्डी पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून अशा प्रकारची कोणी गुन्हेगारी कृत्य करत असेल तर त्याच्या विरोधात शिर्डी पोलीस कठोर कारवाई करतील असा इशारा दिला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव रूपवते हे करीत आहे या गुन्ह्यात असली फायटर चाकू हस्तगत करणे बाकी असून हा कट कुठे रचला यात आणखी कोणी सहभागी आहे का या काळात ते कोणाच्या सहवासात होते त्यांना कोणी पाठबळ देत आहे का ह्या अनुषंगाने देखील शिर्डी  पोलीस तपास करत असल्याचे सांगितले.

 

Post a Comment

0 Comments