आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा. आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश !

 राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा.

आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना यश ! 

              



कोपरगांव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आला आहे मात्र हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच.ए.आय.कडे हस्तांतरीत न झाल्यामुळे सदर महामार्गाचे काम करण्यास अडचणी येत होत्या. सदर कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरगाव-सावळीविहीर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे.

              कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टींने अत्यंत महत्वाचा दक्षिण-उत्तर असलेला व काही महिन्यांपूर्वी घोषित करण्यात आलेल्या सावळीविहीर ते सेंधवा (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी) या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या मार्गावरून नियमितपणे एक लाख मेट्रिक टन वजनाच्या जवळपास दहा हजार वाहनांची दैनिक वर्दळ असते. कोपरगाव तालुक्याच्या शेजारीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान असल्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसात या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

              या मार्गाचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू होऊन उच्च दर्जाचे काम व्हावे यासाठी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. शरदचंद्रजी पवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याचा भाग म्हणून सोमवार (दि.१९) रोजी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरगाव-सावळीविहीर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे. सदर ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होऊन त्याचे काम होण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असून त्याबद्दलचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी राजेंद्र बिडवई यांनी नुकतेच आमदार आशुतोष काळे यांना सुपूर्द केले. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री  मा.ना. अशोक चव्हाणसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) श्री. उल्हास देबडवारअपर मुख्य सचिव श्री. मनोज सौनिकउपसचिव श्रीमती प्रज्ञा वाळके व अहमदनगर विभागाचे अधिक्षक अभियंता श्री जे.डी. कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे

Post a Comment

0 Comments