कोपरगावात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर लढवली आगळी वेगळी शक्कल जागेवरच कोरोना तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या सह प्रशासनाने केली कारवाई
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:-----
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे हा प्रदूर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाच्या वतीने ब्रेक द चैन मिशन अंतर्गत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अटी शर्ती घालून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या असून संचारबंदी लागू केली आहे असे असतांना देखील नागरिक विनाकारण घरा बाहेर फिरतांना दिसत असल्याने कोपरगाव नगरपालिका,आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांची कोरोना रॅपिड अँटीजन तपासणी करत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.या कारवाईत पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे त्यांचे सर्व सहकारी पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे, सहाय्यक फौजदार बबन साठे,होमगार्ड बाळासाहेब धाकराव, श्रावण चव्हाण, रवींद्र खुडे त्यांचे सर्व सहकारी लॅब टेक्निशियन भाऊसाहेब गायकवाड आरोग्य कर्मचारी योगेश कोळी शशिकांत बैसाने यांचा समावेश आहे
कोपरगाव शहरात संचारबंदीचा काळात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बंदच्या काळात अत्यावश्यक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. त्याच गोष्टींचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे रिकाम फिरणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचा फैलाव करणाऱ्या नागरिकांना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे तोपर्यंत अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले असून आज या ठिकाणी 21 टेस्ट करण्यात आल्या असून 2 जण कोरोना बाधित आले आहे.
विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांना प्रशासनाच्या या कारवाईमुळे वचक बसण्यास मदत मिळणार आहे.
0 Comments