आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

ट्रामा केअर सेंटरचा ड्रामा करून माजी लोकप्रतिनिधींनी वैश्विक कोरोना संकटाचा राजकीय आखाडा करू नये – मा. सभापती सौ. अनसूया होन


ट्रामा केअर सेंटरचा ड्रामा करून माजी लोकप्रतिनिधींनी

वैश्विक कोरोना संकटाचा राजकीय आखाडा करू नये – मा. सभापती सौ. अनसूया होन

            कोपरगाव प्रतिनिधी:----  मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटापुढे संपूर्ण विश्वाने हात टेकले आहे. अनेक देशात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशीच परिस्थिती आपल्या देशातील काही राज्यात देखील आहे व यामध्ये दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे.त्यामुळे राज्यात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. हि वास्तव परिस्थिती नाकारून चालणार नाही. मात्र अशा वैश्विक संकटात सर्वांनी एकत्र येवून या जीवघेण्या संकटातून जनतेचा जीव वाचविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्याच्या माजी लोकप्रतिनिधी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असून त्यांनी ट्रामा केअर सेंटरचा ड्रामा करून वैश्विक कोरोना संकटाचा राजकीय आखाडा करू नये असा सल्ला पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अनुसयाताई होन यांनी कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नवा न घेता दिला आहे.

                     सौ.अनुसयाताई होन यांनी पुढे असे म्हटले आहे की, आज संपूर्ण विश्वावर जीवघेण्या कोरोना संकटाचे सावट आहे. या संकटातून मानवाची सुटका करण्यासाठी जगभरासह आपल्या देशातील संशोधक अहोरात्र परिश्रम घेत असून आरोग्य विभाग आपल्या जीवावर उदार होवून बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करीत आहे. त्यामुळे आपण मागील दोन महिन्यांपूर्वी कोरोनावर अतिशय चांगल्या प्रकारे नियत्रण मिळविले होते. मात्र कोरोना संकटाला सहजपणे घेतल्यामुळे व चेहऱ्यावरचे मास्क काढले गेल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात रुग्ण संख्या कमी झालेली असतांना देखील कोविड हॉस्पिटल सुरु ठेवले होते याची जाणीव ज्या बाधित रुग्णांनी उपचार घेतले त्यांना आहे मात्र याची जाणीव माजी लोकप्रतिनिधींना नाही. भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल ओळखून १७ मार्च पासूनच आमदार आशुतोष काळे यांनी एस.एस. जी.एम. येथील कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. मागील काही दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून त्यांनी प्रशासनाला ३५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत दिलेल्या सुचनेनुसार आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वसतिगृहात ३५० बेडचे सुसज्ज सुसज्ज कोविड केअर सेंटर देखील सुरु होणार आहे.

जेव्हापासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे संकट सुरु आहे तेव्हापासून आमदार आशुतोष काळे सदैव प्रशासनाच्या सोबत राहून प्रशासनाला हवी ती मदत करीत आहे याची जाणीव जनतेला आहे मात्र माजी लोकप्रतिनिधींना नाही. दुर्दैवाने कोरोना बाधित झालेले रुग्ण हे आपल्याच तालुक्यातील व आपल्याच कुटुंबातील आहेत याची जाणीव ठेवा. त्यांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी पुढे यायचे सोडून आपण राजकारण करता हे अत्यंत चुकीचे आहे. राजकारण करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतील, मात्र आज जनतेचा जीव महत्वाचा आहे. त्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या शालीन राजकारणाची परंपरा जपली नाही तरी चालेल मात्र जनता दुःखाचे चटके सहन करीत असतांना त्यांच्या वेदनांशी खेळू नका असे भावनिक आवाहन समितीच्या माजी सभापती सौ. अनुसयाताई होन यांनी कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांना केले आहे.

          चौकट :- मागील पाच वर्षात गल्ली पासून दिल्ली पर्यंत त्यांचे सरकार असतांना ट्रामा केअर सेंटरला निधी मिळविनाऱ्या माजी लोकप्रतिनिधी अशा जीवघेण्या संकटात ट्रामा केअर सेंटरचे राजकीय भांडवल करतात हे कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे दुर्दैव आहे – सभापती सौ. अनुसयाताई होन


Post a Comment

0 Comments