Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी - आमदार आशुतोष काळे

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी - आमदार आशुतोष काळे.

      

        


कोपरगाव प्रतिनिधी:----  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. ज्ञानाबद्दल प्रचंड आत्मियता असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी मांडलेली तत्वे आदर्श असून त्यांनी केलेलं कार्य हे विशिष्ट समाजापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेतून देशाच्या जडणघडणीत दिलेलं योगदान अजोड असून आजही त्याचेह विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

                            भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानवभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आमदार आशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले कीमागील अनेक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आपण दरवर्षी सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो मात्र मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी लागली. यावर्षी तर मागील वर्षापेक्षा देखील अवघड परिस्थिती असल्यामुळे आपल्याला सलग दुसऱ्या वर्षी अतिशय साधेपणाने जयंती साजरी करावी लागत आहे. मात्र मागील वर्षी आपण ज्याप्रमाणे या कोरोना संकटावर मात केली त्याप्रमाणे आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर देखील निश्चितपणे निश्चितपणे नियंत्रण मिळवू असा आशावाद व्यक्त करून सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

                    यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधनेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मेहेरखांब,सुरेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिक कोळपे,उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोरके.पी.रोकडेमाजी सरपंच सचिन कोळपेपोलीस पाटील संजय वाबळे,अरुण लोंढेडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य व सुरेगाव ग्रामस्थ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टशिंग ठेवून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments