Vardhapan bannr

Vardhapan bannr

Sanjivani collage

Sanjivani collage

Yogesh

Yogesh

गुढीपाडव्याचे औचित्य साधत विवेक कोल्हे यांनी साधला कोरोनाबधित रुग्णांशी सवांद. पुरणपोळी देत केला पाडवा गोड


गुढीपाडव्याचे औचित्य साधत विवेक कोल्हे यांनी साधला कोरोनाबधित रुग्णांशी सवांद.
पुरणपोळी देत केला पाडवा गोड

तुटवडा जाणवत असलेल्या औषधांची नामदार राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली मागणी.







कोपरगाव प्रतिनिधी:----
देशासह राज्यात कोरोना आजाराने धुमाकुळ घातला आहे. दिवसागणिक वाढती रूग्णासंख्येमुळे नागरीक भयभीत झालेले आहे. अनेकांच्या कुटूंबातील काही सदस्य कोविड सेंटरमध्ये तर काही विलगीकरण कक्षात आहे. या परिस्थितीचा परिणाम आजच्या नववर्षारंभदिनी गुढीपाडवा या सणावर दिसुन आला. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक श्री विवेकभैया बिपीनदादा कोल्हे यांनी आज कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट देउन गुढीपाडवा दिनानिमित्त रूग्णांना पुरणपोळीच्या जेवणाचे वाटप केले. त्यांचेशी संवाद साधत कोरोनाबाधित रूग्णांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. कमी पडत असलेले औषधे, सिलेंडर आणि आॅक्सीजन मशीनची गरज लक्षात घेउन तातडीने कोविड सेंटरला सिलेंडरसह आॅक्सीजन मशीन व औषधे उपलब्ध करून दिले.
यावेळी श्री कोल्हे म्हणाले, आज देशात संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली असुन महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. कोपरगाव तालुक्यातही रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे या संकटाला आपल्यासर्वांना एकजुटीने सामोरे जायचे आहे. आपण सर्व एका कुटूंबातील असुन घाबरून न जाता या संकटाचा मुकाबला करायचा आहे. रूग्णांना  समस्यांची विचारपूस करत, आपण सर्वजण मिळून यातून लवकरच बाहेर पडू, असा धीर दिला.
ज्या ज्या वेळी तालुक्यावर संकटाची परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी संजीवनी उदयोग समूह नेहमीच मदतीला धावून येत असतो. अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी कोरोना महामारीच्या सुरूवातीपासून नागरीकांच्या सुरक्षितेसाठी विविध उपक्रम राबविले आहे. कोरोना आजारापासून बचाव होण्यासाठी नागरीकांना मास्क,सॅनिटायझर आदीसह सुरक्षिततेच्या साहित्याचा पुरवठा करत नागरीकांना लसीकरणासाठी मोलाची मदत करीत आहे. गेल्या वर्षभरापासून या प्रसंगाला सामोरे जात असतांना येणा-या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,महसूलमंत्री, ग्रामविकास तथा पालकमंत्री,  जिल्हाधिकारी, तहसिलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रूग्णांना तुटवडा जाणवत असलेल्या औषधांचा तातडीने पुरवठा करण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार राजेंद्र शिंगणे यांचेशी संपर्क करून औषधे उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली असल्याचे श्री विवेक कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक,शिवाजी खांडेकर,जनार्धन कदम ,रविंद्र रोहमारे, सागर जाधव, प्रमोद नरोडे, दिपक जपे, वैभव गिरमे, जगदीश मोरे, शुभम काळे उपस्थित होते. यावेळी कोविड सेंटरला काम करत असलेल्या वैदयकिय अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नागरीकांना सुविधा देत असल्याबददल त्यांचे अभिनंदन केले.

चौकट - संजीवनीने दिली ख-या अर्थाने संजीवनी.

डाॅ.आदित्य पाटील यावेळी म्हणाले, एस.एस.जी.एम.काॅलेज येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये रूग्णांना आॅक्सीजन सुविधा देण्यासाठी येणारी अडचण श्री विवेकभैया कोल्हे यांचेपुढे मांडली असता क्षणाचाही विलंब न करता तातडीने आॅक्सीजन मशीन, सिलेडर आणि औषधे उपलब्ध करून दिल्याने रूग्णांना संजीवनीने ख-या अर्थाने संजीवनी देण्याचे

Post a Comment

0 Comments