आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

काळे गटाचे थोरात यांचे सरपंचपद अबाधित, विरोधकांची खेळी व्यर्थ

 काळे गटाचे थोरात यांचे सरपंचपद अबाधित, विरोधकांची खेळी व्यर्थ



कोपरगाव प्रतिनिधी:---------
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीचे सरपंच बाबुराव थोरात यांच्यावर विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव सरपंच बाबुराव थोरात यांनी पाच विरुद्ध तीन मतांनी जिंकत आपले सरपंचपद अबाधित ठेवले असून विरोधकांची खेळी मात्र व्यर्थ गेली आहे.                 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या ३ वर्षापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काळे गटाचे बाबुराव कारभारी थोरात हे जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले होते. यामध्ये काळे गट ३, शिवसेना गट १, भाजप १, सत्यशोधक पॅनलचे ३ असे एकूण ८ सदस्य निवडून आले होते. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळके गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच बाबुराव थोरात यांनी जवळके गावात रस्ते, शाळा खोल्या, शाळेसाठी संरक्षक कम्पाऊंड, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी निधी मंजूर करून जवळके गावात अनेक विकास कामे केली आहेत. मात्र विरोधकांना होत असलेली विकासकामे सहन न झाल्यामुळे त्यांनी काही सदस्यांना आमिष दाखवून विद्यमान सरपंच बाबुराव  थोरात यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत सोमवार (दि.१२) रोजी घेण्यात आलेल्या मतदानात सरपंच बाबुराव थोरात यांच्या बाजूने तीन व विरोधकांच्या बाजूने पाच मतदान पडले. त्यामुळे सरपंच बाबुराव थोरात यांनी अविश्वास ठराव जिंकून आपले सरपंच पद अबाधित ठेवले आहे. मात्र विरोधकांनी रडीचा डाव खेळून खेळलेली खेळी व्यर्थ गेल्यामुळे त्यांना तोंडघशी पडण्याची नामुष्की आली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी व मंडल अधिकारी बाबा जेडगुले यांनी काम पाहिले त्यांना तलाठी सानप एम.आर. व ग्रामसेवक श्रीमती ए. ई. शेलार यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.सरपंच बाबुराव थोरात यांनी अविश्वास ठराव जिंकताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Post a Comment

0 Comments