आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

खाजगी डेडीकेटेड कोविड सेंटरने येणाऱ्या सर्व रुग्णांवर उपचार करावे तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी बांधील :- आमदार आशुतोष काळे

खाजगी डेडीकेटेड कोविड सेंटरने येणाऱ्या सर्व रुग्णांवर उपचार करावे

तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी बांधील :- आमदार आशुतोष काळे

 


       


 कोपरगाव प्रतिनिधी:----- कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या व काही बाधित रुग्णांचा कोरोनामुळे झालेले मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्व खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावे. तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मी बांधील असून आपण कृपा करून बाधित रुग्णांना उपचारासाठी बाहेर पाठवू नका अशी कळकळीची हात जोडून विनंती आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांना केली.

                  आमदार आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या सर्व खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांची रविवार (दि.११) रोजी साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे बैठक घेतली. या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी अक्षरशः हात जोडून केलेल्या विनंतीमुळे वातावरण काहीसे भावनाविवश झाले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, अचानकपणे कोरोना बाधित रुग्णांची वाढलेली संख्या त्यामुळे आरोग्यसेवेवरील ताण प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत सरकारी रूग्णालयाप्रमाणेच खाजगी डॉक्टर देखील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे आले हि अतिशय समाधानाची बाब आहे. आजच्या नाजूक परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांसाठी डॉक्टर हेच एकमेव आशेचा किरण आहे. अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपण घेत असलेले कष्ट करीत असलेली तळमळ पाहून डॉक्टरांच्या रुपात देव उपचार करीत आहे. आरोग्य विभाग व प्रशासन आपल्या परीने योग्यप्रकारे त्यांचे कर्तव्य बजावत आहे. आरोग्य विभागाच्या मागणीनुसार आवश्यक त्या सोयी सुविधा देखील वेळेत उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्याजोडीला आपण सर्वांनी सेवाभावी वृत्ती जोपासून आपल्यातील देवाच्या रूपातून कोरोना बाधित रुग्णांना आपल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची विनंती यावेळी त्यांनी  सर्व खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या प्रमुखांना केली आहे.

           यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदेग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदरतालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधातेडॉ. दत्तात्रय मुळेडॉ. अमोल अजमेरेडॉ. योगेश कोठारीडॉ. राजेश माळी,डॉ. मयूर तिरमखे,  डॉ. संकेत माळीसंत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे सेक्रेटरी  प्रसाद कातकडेआत्मा मलिक हॉस्पिटलचे शरद अनारसेअभिमन्यू सूर्यवंशी,श्रीमती कांचन कदम आदी उपस्थित होते.

       



चौकट :- खाजगी डॉक्टरांना येत असलेल्या ऑक्सिजन पुरवठा, रेमडीसीव्हर इंजेक्शन तुटवडा या अडचणी सोडविण्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून शासकीय यंत्रणा व खाजगी डॉक्टर आपण सर्वजण मिळून नक्की मात करू असा विश्वास देत यावेळी आशुतोष काळे यांनी जनतेसाठी हात जोडून केलेल्या विनंतीमुळे आम्ही अक्षरशः भारावून गेलो असून शेवटच्या क्षणापर्यंत बाधित रुग्णांना कोपरगावतच उपचार देण्यासाठी प्रयत्न करू.

- डॉ. अमोल अजमेरे

Post a Comment

0 Comments