कोपरगाव मतदार संघाला खावटी अनुदान योजनेचे १ कोटी १६ लाख.
व मुस्लीम कब्रस्थानसाठी २५ लाख मंजूर. आमदार आशुतोष काळे.
कोपरगाव प्रतिनिधी:----- आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या आदिवासी कुटुंबासाठी महत्वाचा आधार असलेल्या खावटी योजनेला महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षी पुन्हा सुरु करून आदिवासी समाजाला न्याय दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी खावटी अनुदान योजने अंतर्गत २८९८ कुटुंबांना १ कोटी १६ लाख रुपये मंजूर झाले असून तसेच तालुक्यातील चांदेकसारे, चास नळी व शिरसगाव-सावळगाव च्या मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानसाठी अल्पसंख्यांक विभागाकडून २५ लाख रुपये मंजूर झाले झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मागील वर्षी २२ मार्च २०२० पासून जागतिक कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना रोजगार मिळत नसल्यामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अशा संकटकालीन परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना न्याय देण्यासाठी २०१४ पासून बंद असलेली ऑगस्ट २०२० मध्ये पुनर्जीवित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव विधान सभा मतदार संघातील एक कोटी सोळा लाख रुपये मिळाले आहेत. याचा गरजू आदिवासी कुटुंबे, ज्यामध्ये घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या,भूमिहीन शेतमजूर, पारधी, मनरेगा, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब व अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, तसेच वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्क धारक कुटुंबाना या योजनेचा लाभ होणार आहे.या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या बँक किंवा पोस्ट खात्यावर रोख स्वरुपात ४००० रुपये रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेच्या एकूण रक्कमेतील ५० टक्के रक्कमेचा पहिला हफ्ता लवकरच लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.यातील पहिला हफ्ता रुपये २०००/-थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या खावटी योजनेचा आदिवासी समाजातील समाजबांधवांना तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.
तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, चास नळी व शिरसगाव-सावळगाव या गावातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानचा प्रश्न मागील काही वर्षापासून अनुत्तरीत होता. त्याबाबत या गावातील मुस्लीम समाज बांधवांनी कब्रस्थानच्या सोयी सुविधा नसल्यामुळे होत असलेल्या गैरसोयीबद्दल आपल्या भावना आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी अल्पसंख्यांक विभागाकडे या चांदेकसारे, चास नळी व शिरसगाव-सावळगाव गावातील मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानसाठी प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून चांदेकसारे १० लाख, चास नळी ८ लाख व शिरसगाव-सावळगावसाठी ७ लाख असा एकूण २५ लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे
0 Comments