आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश रस्त्याच्या रखडलेल्या कामास प्रारंभ

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

रस्त्याच्या रखडलेल्या कामास प्रारंभकोपरगाव प्रतिनिधी:-----  कोपरगाव शहरातील बैलबाजार हा रस्ता शहरातील विविध उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून उपनगरातील नागरिकांसाठी हा सोयीचा मार्ग आहे. ह्या रस्त्याचे काम जवळपास एक वर्षापासुन बंद पडलेले होते. या रखडलेल्या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या मोठमोठ्या कपारी आणि पडलेल्या खड्यांमुळे तसेच स्पिडब्रेकर नसल्याने सतत अपघात घडत होते. मागील सात आठ महिन्यांपासुन आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी हे या कामासाठी पाठपुरावा करत होते. गेल्या डिसेंबर महिन्यात नगरपालिकेला निवेदन देऊन रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात आली होती. व वारंवार नगरपालिकेचे अधिकारी यांची भेट घेऊन कामा बाबत पाठपुरावा करून व ठेकेदारास काम चालु करण्यास सांगायचे परंतु त्यास काहीच प्रतिसाद भेटत नाही हे लक्षात आल्यावर ७ एप्रिल रोजी नगरपालिकेला पुन्हा निवेदन देऊन प्रशासनास सांगितले की बैलबाजार रस्त्याचे काम त्वरित चालु करावे जर १ मे पर्यंत बैलबाजार रस्त्याचे काम चालु झाले नाही तर नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी दिला होता.

नगरपालिका प्रशासनाकडून नवाज कुरेशी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत बैलबाजार रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बैलबाजार रस्त्याचे काम चालु झाल्यावर या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे

Post a Comment

0 Comments