आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांचे इतिहासात प्रथमच 8 लाख मे.टन सर्वाधिक गाळप

 सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांचे इतिहासात प्रथमच 8 लाख मे.टन सर्वाधिक गाळप





कोपरगाव प्रतिनिधी:----
सहकारी साखर कारखानदारी ही ग्रामिण अर्थकारणाची जननी असून सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच यशस्वी सर्वाधिक 8 लाख 11 हजार 633 मे टन उसाचे गाळप करून देशात सहकारी तत्वावर उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करणांरा सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना पहिला ठरला असल्याचेही प्रतिपादन अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या 2020.21 गळीत हंगामाची सांगता अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजीमंत्री शंकरराव कोल्हे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांच्या उपस्थितीत, संचालक ज्ञानेश्वर भगवंता परजणे, सौ. ललिता ज्ञानेश्वर परजणे या उभयतांच्या हस्ते शुक्रवारी कोरोना महामारीतील सर्व नियमांचे पालन करून अतिशय साध्या पध्दतींने झाली त्याप्रसंगी   बिपीन कोल्हे यांनी ही माहिती दिली.  प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे व शेतकी अधिकारी गोरखनाथ शिंदे यांनी गळीत हंगाम 2020.21 बाबत माहिती दिली.
श्री. बिपीन कोल्हे पुढे म्हणांले की, सहकारी साखर कारखानदारीत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांने असंख्य संघर्षावर मात करत नवनविन पायलट प्रकल्प सुरू करून ते यशस्वी केले.  चालु गळीत हंगामात 8 लाख 11 हजार 633 मे टन उसाचे गाळप केले. थेट उसाच्या रसापासून 83 लाख लिटर्स इथेनॉल उत्पादन घेतले आहे व राज्यात सर्वाधिक 2 लाख 7 हजार 540 मे. टन रॉ शुगर व 45 हजार मे. टन पांढरी साखर निर्यातीतही पहिला क्रमांक पटकावला आहे. चालु गळीत हंगामात इतिहासात प्रथमच देशात थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती करण्यांचे धाडस कोल्हे कारखान्यांने यशस्वी करून दाखविले आहे त्याचबरोबर प्ॉरासिटामोल या औषध निर्मीतीसाठीची उच्च  तंत्रज्ञानावर आधारीत प्रयोगशाळेची निर्मीती करून युवानेते विवेक कोल्हे हे स्वत: लक्ष देवुन अल्पावध्ीतच प्रकल्प उभारणी करीत आहेत.  उस उत्पादक सभासद शेतकरी, संचालक मंडळ व व्यवस्थापनांच्या सहकार्याने सहकारी कारखानदारीत जे जे नविन तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करत, जागतिकीकरणांच्या स्पर्धेत कुठेही मागे न राहता दैनंदिन गाळप क्षमता वाढवत संजीवनीने राज्याला अनेक दिशादर्शक प्रकल्प देत सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

फो

Post a Comment

0 Comments