आदित्य गार्डन

आदित्य गार्डन

Yogesh

Yogesh
saicharan

Sai c.

Sai c.

राज्य सरकारने कांदा उत्पादन शेतक-यांना प्रतिक्विंटल 400 रूपयाचे अनुदान दयावे. माजी आमदार. सौ स्नेहलता कोल्हे यांची मागणी.


राज्य सरकारने कांदा उत्पादन शेतक-यांना प्रतिक्विंटल 400 रूपयाचे अनुदान दयावे.

माजी आमदार. सौ स्नेहलता  कोल्हे यांची मागणी.


कोपरगाव प्रतिनिधी:----- महाराष्ट्र राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठया प्रमाणात आहे. कांदा उत्पादनामुळे शेतक-यांना निश्चितच आर्थीक हातभार लागत असतो, परंतु सध्याच्या कालावधीत कांदयाच्या दरामध्ये मोठी घसरण होत असल्याने त्यांच्यापुढे आर्थीक संकट उभे राहिले आहे, त्या करीता या कांदा उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल 400 रूपयेप्रमाणे अनुदान देण्यात यावे,अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी  केली.
राज्याचे कृषीमंत्री नामदार दादाजी भुसे यांना पाठविलेल्या निवेदनात सौ कोल्हे यांनी ही मागणी केली, निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने कांदा उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना दुबार बियाणे घेउन कांदा लागवड करावी लागली, त्यामुळे मोठया आर्थीक नुकसानीस सामोरे जावे लागले. सध्या कांदा पिकाच्या काढणीचे काम सुरू असुन कांदा हे नाशीवंत पिक असल्याने जास्त दिवस ठेवू शकत नाही. सध्या लाॅकडाउन सुरू असल्याने निर्बंध लावण्यात आले आहे. कांदा पिकाचे दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी बांधवापुढे मोठे आर्थीक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मागील सरकारच्या काळात कांदा उत्पादक शेतक-यांना अडचणीच्या काळामध्ये अनुदान देण्यात आले होते, त्याप्रमाणे या सरकारनेही शेतक-यांच्या अडचणींचा विचार करून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना प्रतिक्विंटल 400 रूपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी सौ कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री नामदार भुसे यांचेकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments